श्रद्धा कपूरच्या आगामी 'ईठा' चित्रपटाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. लावणी नृत्यांगना विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी या शीर्षकामुळे त्यांच्या वारशाचा गैरसमज होऊ शकतो, अशी भूमिका घेत टायटल बदलण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे चित्रपटाची चर्चा वाढली असून निर्मात्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रपटाच्या शार्षकावर पुनर्विचार करण्याची मागणी नारायणगावकर कुटुंबीयांनी केलीय.
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी 'ईठा' या चित्रपटाच्या शीर्षकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या लोककला परंपरेतील मानाचे स्थान असलेल्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत निर्मात्यांनी हे शीर्षक बदलावे, अशी मागणी केली आहे. या घडामोडीमुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, 'ईठा' या शीर्षकाचा वापर केल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाचा संबंध त्यांच्या कुटुंबाशी किंवा विठाबाईंच्या आयुष्याशी असल्याचा गैरसमज निर्माण होऊ शकतो. तसेच महाराष्ट्राच्या लोककलेतील एका दिग्गज कलाकाराच्या वारशाचा सन्मान राखला जावा, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे चित्रपटाचे नाव बदलून योग्य शीर्षक देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (NCP) ने प्रश्न उपस्थित केला की, बायोपिकचे नाव विठाबाई यांच्या नावावर का नाही ठेवलं गेलं? आता नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी ही मागणी केलीय की, ज्या चित्रपटात त्यांची कहाणी दाखवली जाईल, त्यामध्ये त्यांचे नावच सर्वात प्रमुख असायला हवं.
काय आहे मागणी?
एका रिपोर्टनुसार, एनसीपी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने बायोपिकचे नाव 'ईठा' (Eetha) ठेवण्यावरून निर्मात्यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. पक्षाचे मानणे आहे की, विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचे नाव 'विठा' या 'विठाबाई' असायला हवं होतं.
काय बदलणार ईठा चित्रपटाचे नाव?
रिपोर्टनुसार, विठाबाई नारायणगावकरच्या परिवाराने देखील चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यांची मुले, नातू , यांनी 'ईठा' नावावरून नाराजी व्यक्त केलीय. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या शीर्षकावर पुन्हा विचार करावा, असे म्हटले आहे. पण आतापर्यंत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि मॅडॉक फिल्म्सने या वादावर कुठलेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही