Goa Narkasur Festival : गोव्यातील गल्लोगल्ली साकारलेत भव्य 'नरकासुर'

पुढारी वृत्तसेवा

गोव्यामध्ये दिवाळीनिमित्त नरकासुर प्रतिमा बनवण्याची परंपरा अतूट आहे. नरक चतुर्दशीच्या पहाटे या प्रतिमांचे दहन केले जाते.

दरवर्षीपेक्षा यंदा वेगळे काय करता येईल, यासाठी युवक विविध तांत्रिक प्रयोग करून प्रत्यक्ष हलते देखावे साकारण्यात आले आहेत

पारंपरिक पद्धतीने नरकासुराच्या प्रतिमा साकारताना हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत खर्च केला जातो , २० ते २५ युवक एकत्र येऊन अहोरात्र मेहनत घेतली आहे

गोवा मुक्तीपूर्वी लहान स्वरूपात असणाऱ्या या प्रतिमांचे स्वरूप आता भव्य आणि स्पर्धात्मक झाले आहे.

बाजारपेठेतही नरकासुराचे लहान-मोठे मुखवट्यांची किंमत २०० रुपयांपासून पुढे आहे. तसेच सजावटीच्या वस्तूंनाही चांगली मागणी दिसून येत आहे.

गोव्यात नरकासुर दहनाला विशेष सांस्कृतिक महत्त्व असून, पहाटेच्या सुमारास नरकासुर प्रतिमांचे दहन करून वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगुलपणाचा विजय साजरा केला जातो.

यंदाही राज्यातील विविध भागांत नरकासुर प्रतिमांची उभारणी आणि दहनाची तयारी उत्साहात करण्यात आली आहे.

दरम्यान, काही भागांत अचानक पावसाने हजेरी लावल्याने नरकासुर उत्सवाच्या तयारीवर पाणी फेरले.

पावसामुळे उघड्यावर ठेवलेल्या काही नरकासुर प्रतिमा भिजल्याचे प्रकार घडले. त्यामुळे आयोजकांची काहीशी धावपळ उडाली.

मेहनत घेऊन तयार केलेल्या प्रतिमांना पावसाचा फटका बसल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीही दिसून आली.

तरीही पावसाच्या व्यत्ययावर मात करत गोमंतकीयांनी नरकासुर दहनाचा उत्साह कायम ठेवला असून, राज्यभरात दिवाळीच्या उत्सवाला पारंपरिक रंग चढू लागला आहे.