shreya kulkarni
कपडे दान करणे ही एक पुण्याची गोष्ट मानली जाते. पण काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेतली नाही, तर त्याचे परिणाम आपल्या जीवनावरही होऊ शकतात.
कारण प्रत्येक कपड्यात आपल्या शरीराची ऊर्जा साठलेली असते. त्यामुळे कपडे दान करताना खालील नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
गुरुवार हा गुरु ग्रहाशी संबंधित मानला जातो. या दिवशी कपडे दान करणे टाळावे, अन्यथा शुभ परिणामाऐवजी अडचणी वाढू शकतात.
कपडे दान करण्याआधी त्यांना मिठाच्या कोमट पाण्यात धुतल्यास त्यातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि ते शुद्ध होतात.
कपड्यांचा थोडासा भाग कापल्याने आपल्या उरलेल्या उर्जेचा पूर्णत: विलय होतो. त्यामुळे ते कपडे दुसऱ्याला द्यायला योग्य होतात.
कपडे उलट बाजूने घडी घालू नये. कपडे सरळ घडी घालूनच दान करावेत. हे शास्त्रशुद्ध मानले जाते आणि शुभ मानले जाते.
फाटलेले, जुने, वापरण्यायोग्य नसलेले कपडे दान करू नयेत. स्वच्छ, चांगल्या स्थितीतील कपड्यांचे दानच फलदायी मानले जाते.