संतोेष दुवेकरच्या हिडन वेबसिरीजचे ट्रेलर लॉन्च झाले  
Latest

हिडन मध्ये दडलंय काय? ट्रेलर लॉंन्च!

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : हिडन ही संतोष जुवेकरची नवी हिंदी वेबसीरीज Hidden चा ट्रेलर लॉन्च करण्यात आले. हिडन ही मेगा वेबसीरीज १६ जुलैला रिलीज हहोणार आहे. ती 'पिंग पॉंग' ओटीटीवर पाहायला मिळेल. संतोष जुवेकरच्या हिडन – Hidden या सीरीजची प्रतीक्षा, कुतूहल, उत्सुकता संपली आहे.

हिडन – Hidden या संतोष जुवेकर याच्या ट्रेलरबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. संतोष जुवेकर याच्या हिडन – Hidden  ६ जुलैला अनेक असलेल्या रहस्यांची उकल होणार आहे.

हिडन – Hidden ही ७ भागांची आणि ३ सीझन असलेली मेगा वेब सीरिज आहे. ही काल्पनिक कथा आहे. या वेब सीरिजचे तिन्ही सीजन पाहिल्यानंतरच यातील रहस्य नेमकं काय आहे.  त्याचा उलगडा होणार आहे. ही एक डार्कशेड असलेली मुंबई शहरातील गोष्ट आहे.

व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत. गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी आहे. गुन्हेगार-पोलीस यांच्यातील वेगवान घटना गुंतवून ठेवतील. पोलिस, गुन्हे, ड्रग्ज, खून, रहस्य यांचे चित्र पहायला मिळणार आहे.

पाहा फोटोज 

[visual_portfolio id="4085"]

एका रात्री प्रदीप राजे (एसीपी क्राइम ब्रँच) यांना खबर मिळते.  त्यांचा विश्वासू खबरी (हलका) एक माहिती देतो. मध्यरात्री अडीचला तुरूंगात एकाचा खून होणार आहे. अशी खबर असते.

एसीपी राजे ही गोष्ट गांभीर्याने घेतात. आयुक्त यशवंत नाईक यांना याबाबत पूर्व कल्पना देतात. समय दीक्षित या विद्यार्थ्याला अज्ञात मारेकऱ्याने धमकी दिली. त्याला वाचविण्यासाठी राजे आपल्या ३ विश्वासू अधिकाऱ्यांसोबत योजना आखतात. (संदीप, प्रभाकर आणि उमर)

पोलिस आयुक्त (यशवंत नाईक), यांचा या प्रकरणाशी संबंध आहे. पोलिस अधिकारी राजे वैयक्तिकरित्या या बाबीकडे लक्ष देतात. समय तुरूंगात आहे. मारेकरी म्हणून जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. त्याचा जिवलग मित्र मनन शाह याच्या हत्येचा त्याच्यावर आरोप येतो. पण, ते कशासाठी, याचा उलगडा यातून होईल.

समय खरोखर गुन्हेगार आहे कि निर्दोष? त्याला राजे वाचवू शकणार का? त्याच्या भूतकाळात असे काय घडले ?

नेमकं वास्तव काय आहे?

हिडन या बिग बजेट वेबसीरीसचे ७ भाग १६ जुलैपासून पहायला मिळणार आहेत. आम्ही या ७ एपिसोडच शूट हे अवघ्या १५ दिवसात केलं आहे आणि ते पण करोना काळात.

ज्या वेळी शूटिंगचे नियम शिथिल केले होते त्यावेळी. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी मेहनत घेतली आहे. ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी खात्री आहे."

'पिंग पॉंग'चे चॅनेल हेड चेतन डीके म्हणाले "जीवनात जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे रोटी, कपडा, मकान और मोबाईल."

हिडन ज्यावेळी हा कन्सेप्ट माझ्यासमोर आला. त्यावेळी आम्ही ताबडतोब फायनल केलं. कारण उत्तम कथा, पटकथा आणि संवाद होते.

ते म्हणाले, गील १५ वर्षांचा अनुभव मी पणाला लावला हहोता.  ही संहिता सर्वच वयोगटातील लोकांना आवडेल. खिळवून ठेवेल अशी आहे.

त्याबद्दल निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ या सर्वांचे मनापासून अभिनंदन. नवनवीन संहिता घेऊन प्रयोजन करून, त्याचे प्रभावी मार्केटिंग केले जाईल.

नेमकं काय हिडन आहे याविषयी लेखक दिग्दर्शक विशाल सावंत यांनी मत मांडले.

हिडन मध्ये संतोष जुवेकरची महत्त्वाची भूमिका आहे.

ते म्हणाले, "याबाबत सर्वच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. येत्या १६ जुलैला ही उत्सुकता गहिरी होईल. नेमकं काय हिडन आहे, याविषयी चर्चा होईल.

परंतु, प्रश्नांची उकल होण्यासाठी ३ सीजन पाहणं गरजेचं आहे.पण, हिडन मध्ये मुंबई शहरातील डार्कशेड दिसेल. गुन्हेगार -पोलीस यांच्यातील वेगवान घटना गुंतवून ठेवतील."

निर्मिती विशाल पी. सलेचा, महेश पटेल यांनी केली आहे. विशाल सावंत यांनी लेखन, दिग्दर्शन केले आहे.

कमल सिंग यांचे छायांकन आहे. रसीद खान यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. संतोष जुवेकर, संजय सोनू या कलाकारांच्या भूमिका आहेत.

दक्ष अजित सिंग, जीत सिंग, मनवीर चौधरी, रजत वर्मा, रोहित परशुराम आणि संदीप पाठक यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

पाहा व्हिडिओ – हिडन वेबसिरीजचा ट्रेलर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT