सेालापूर : पुढारी वृत्तसेवा : 'स्वराज्य' निर्मितीसाठी छत्रपती संभाजीराजे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांना साथ द्या, असे आवाहन युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी सोलापुरात केले आहे
संभाजी आरमारच्या वतीने गुरुवारी सोलापुरातील सरस्वती चौकात आयोजित करण्यात आलेल्या शिवस्फूर्ती मेळाव्याप्रसंगी बोलत होते. यावेळी संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, सागर डगे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शहाजीराजे म्हणाले, संभाजी आरमार ही समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी अक्रमकपेण काम करित आहे. संघटनेच्या नावाप्रमाने काम सुरू आहे. कोरोना काळात संघटनेने चांगले काम केले आहे. तसेच वंचिताना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न असतो त्यासाठीच आम्ही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो आहे. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या घडामोडींमुळे विशेषत: आमच्याबाबत सुरू असलेल्या घटनांवर आमच्या आजूबाजूचे लोक टेंशनमध्ये दिसत आहेत. सर्वजण विचारताहेत राजेंचे काय होणार? राजे काय करणार? राजे माघार घेणार की आणखी काय? हे राजेंच्या प्रेमापोटी सर्वांना प्रश्न पडताहेत.
या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसे पाहता यावर शहाजीराजे म्हणाले, आमच्या घरात तणावाचे वातावरण अजिबात नाही. मात्र, यापुढे छत्रपती संभाजीराजे आता सक्रिय राजकारणात उतरणार आहेत. मी लहान आहे. त्यावर बोलणार नाही, असे सांगत त्यांनी सावध पवित्रा घेतला असला तरी मात्र राजेंच्या भविष्याच्या राजकीय नियोजनावर मात्र त्यांनी भाष्य केले. सरस्वती चौकातील ड्रीम पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमाला यावेळी सुहास आदमाने, राजन जाधव, माऊली पवार यांच्यासह महिला आणि युवकांची मोठी गर्दी होती.