Latest

सोलापूर :  बनावट दागिन्याद्वारे सराफाला साडेचार लाखाला फसविले

अमृता चौगुले

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा : सत्यजित कुरूलकर ज्वेलर्स या दुकानात येऊन कुरूलकर यांना ओळख दाखवून, त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना 101 ग्रॅम वजनाचे बनावट दागिने देऊन त्यांच्याकडून वेळावेळी 4 लाख 50 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

समाधान ननवरे (रा. बीबीदारफळ), राहुल पाटील (रा. सावळेश्वर, ता. मोहोळ), युवराज पेठे (रा. मोहोळ) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सत्यजित सुधाकर कुरूलकर (वय 42, रा. लक्ष्मी मार्केट, झुंजे बोळ, पाणी वेस) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, 13 ऑक्टोबर 2021 रोजी 10.30 वाजण्याच्या सुमारास पूर्व मंगळवार पेठ येथे यातील तिन्ही आरोपी हे फिर्यादीच्या सत्यजित सुधाकर कुरूलकर ज्वेलर्स नावाच्या दुकानात येऊन त्या तिघांनी फिर्यादीच्या ओळखीच्या अनिता नारायणकर यांच्या मदतीने ओळख करुन देऊन व त्यांचा विश्वास संपादन करुन हॉलमार्कचा व बीबीसीचा शिक्का असलेले बनावट सोने देऊन फिर्यादी यांच्याकडून 4 लाख 50 हजार वेळोवेळी घेऊन त्यांची फसवणूक केली. या फिर्यादीवरुन तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याचा पुढील तपास जोडभावी पेठ पोलिस करत आहेत. सोलापूर शहर परिसरात असे अनेक प्रकार वारंवार घडत आहेत. आता चोरटे बनावट सोने हे खरे सोने आहे, असे भासवत चक्क सराफांनाही फसवत असल्याने भीती व्यक्त करण्यात येत आहे. वृद्ध महिला अशा प्रकारांना वारंवार बळी पडत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT