सोनू सूद  
Latest

सोनू सूद २०२२ च्या स्पेशल ऑलिम्पिकसाठी भारताचा ब्रँड ॲम्बेसेडर

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ॲनलाईन : सोनू सूद २०२२ च्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये भारताचा ब्रँड ॲम्बेसेडर असेल. सोनू सूद अभिनयाबरोबरचं काेराेना काळात केलेल्‍या सामाजिक कार्यासाठीही ओळखला जातो.

अधिक वाचा – 

साेनू सूद याने  लॉकडाऊन काळात अडकलेल्या अनेक लोकांना मदत केली आहे. कोरोना महामारी काळात सामाजिक कार्य करून त्याने अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

अधिक वाचा –

आता २०२२ मध्ये रशिया येथे होणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये तो भारताचा ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहे. एका व्हर्च्युअल कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली. अभिनेत्याने ही माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सूदने ३० जुलैला आपला वाढदिवस सेलिब्रेट केला.

अधिक वाचा – 

आजचा दिवस खूप खास

सूद रशियामध्ये होणाऱ्या विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धांचा सहभागी होईल. व्हर्च्युअल कार्यक्रमात ५०० हून अधिक ॲथलीट्स, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांसोबत सूदने चर्चा केली.

या चर्चेत सूद म्हणाला, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. कारण, आज मी विशेष ऑलिम्पिक भारतासोबत प्रवासात सहभागी होत आहे. मी खूप आनंदात आहे.

मी माझं भाग्य समजतो. मला या परिवारात सहभागी होण्याची संधी मिळाली.

सूद म्हणाला, मी हे व्यासपीठ आणखी मोठं बनवण्यासाठी आणि देशातील संपूर्ण लोकांचे प्रतिनिधीत्व करण्याची ग्‍वाही देतो. जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धांसाठी रशियामध्ये आमच्या टीमसोबत असणार आहे. त्यामुळे मला अभिमान वाटत आहे.

आपण सर्वजण मिळून आपल्या एथलीट्सना सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी प्रेरणा देऊ, असेही त्‍याने नमूद केले.

हेही वाचलं का? – 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT