Latest

सारा अली खान झाली करण जोहरवर नाराज

Arun Patil

मुंबई : 'कॉफी विथ करण' गेल्या काही दिवसांपासून हा शो पूर्णपणे बंद करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आता या शोचा सातवा सीझन ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणयात आला आहे. या शोमध्ये कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याची प्रतिक्षा प्रेक्षक करत आहेत. पहिल्या भागात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती. आता करण एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आला आहे.

करण जोहर यांच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाच्या सातव्या सीझनचा शो सध्या सुरू आहे. पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांनी भाग घेतला होतो. यावेळी त्यांच्या आयुष्याबद्दल भरपूर चर्चा झाली. मात्र, याच शोमध्ये करणने सारा अली खान व कार्तिक आर्यन यांच्या कथित रिलेशनबद्दल खुलासे केले. यामुळे करणवर सारा चांगलीच नाराज झाली आहे. करणची ही गोष्ट साराला खटकली आहे. तिला सध्या तिच्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे. इंडस्ट्रीतील रिलेशनशीप गॉसिप्समध्ये तिला अद्याप पडायचं नाही. त्यामुळे ती करणवर भडकली आहे.

सारा आणि कार्तिक आर्यन हे त्यांच्यातील रिलेशनमुळे गेल्या काही दिवसांत चर्चेचा विषय बनले होते. मात्र, दोघांनीही या रिलेशनची कधीच वाच्यता केली नव्हती. हे दोघेही कलाकार इम्तियाज अली यांच्या 'लव आज कल' या चित्रपटात एकत्र आले होते. अशातच करण जोहर यांनी आपल्या शोमध्ये या दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितल्याने सारा करणवर चांगलीच नाराज झाली आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल करणने जाहीरपणे बोलावयास नको होते, अशी साराची भावना बनली आहे.

खरंतर कोणाच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा कोणालाच अधिकार मिळत नाही. सारा अली करणसोबत गप्पा मारताना ही गोष्ट बोलली नाही, असे नाही. पण आता ती गोष्ट उकरुन काढल्यामुळे तिच्या करियरकडे न पाहाता लोक पुन्हा सारा अली खानच्या प्रेम प्रकरणाचा तो कित्ता गिरवायला सुरुवात करतील. जर असे झाले तर तिच्या करियरवरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच तिला करणची ही गोष्ट पटली नसावी. 'कॉफी विथ करण' शोचा सातवा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करणच्या रिअ‍ॅलिटी शोचे मागील सहा हंगामाला तुफान प्रतिसाद मिळाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT