file photo  
Latest

सांगली : माजी नगरसेविकेच्या पतीवर खुनी हल्‍ला

backup backup

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार दिनकर शिंदे (वय 49, रा. हनुमाननगर, इस्लामपूर) यांच्यावर शिवसेनेचा तालुकाप्रमुख (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) व त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉडने सोमवारी सकाळी प्राणघातक हल्‍ला केला. या हल्ल्यात शिवकुमार शिंदे गंभीर जखमी झाले आहेत. एकनाथ शिंदे गटात सामील होत नसल्याच्या कारणावरून हा हल्‍ला झाल्याचा आरोप शिंदे दाम्पत्याने केला आहे.

याप्रकरणी शिवसेनेचा तालुकाप्रमुख सागर मलगुंडे याच्यासह त्याच्या अनोळखी सहा साथीदारांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवकुमार यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिवकुमार हे येथील हनुमाननगरमध्ये राहतात. ते बांधकाम व सेंट्रींगचा व्यवसाय करतात. सोमवारी सकाळी शिवकुमार हे मोटारसायकलवरून दूध घेवून घरी निघाले होते.

मंत्री कॉलनी ते हनुमाननगर रस्त्यादरम्यान संशयित मलगुंडे आणि त्याचे साथीदार दबा धरून बसले होते. त्यातील एकाने शिवकुमार यांची मोटारसायकल थांबविली. दुसर्‍याने अचानक शिवकुमार यांच्या हातावर लोखंडी रॉडने हल्‍ला केला. इतर संशयितांनी पायावर, हातावर, पाठीवर, डोक्यात, लोखंडी रॉडने मारहाण केली. शिवकुमार हे मोटारसायकल टाकून पळू लागले. संशयितांनी शिवकुमार यांचा पाठलाग केला. शिवकुमार हे खाली पडले. संशयितांनी शिवकुमार यांच्या पायावर, हातावर रॉडने मारहाण केली. 'शिवकुमार हे जखमी अवस्थेत तेथेच पडले. हल्‍लेखोरांनी मोटारसायकलवरून पलायन केले.

शिवकुमार यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्‍ला झाल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT