दिघंची : पुढारी वृत्तसेवा
दिघंचीमधील वंचित वाड्या -वस्त्यांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेली नळपाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ आमदार अनिल बाबर व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी सरपंच अमोल मोरे उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्यापासून वंचित असणार्या वाड्या आणि वस्त्यांना नळपाणी मिळावे, अशी गेली अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची मागणी होती. त्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत दिघंचीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे. त्या योजनेमधून दोन ठिकाणी पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईन होणार आहे.
या योजनेतून सर्व वंचित मळे व वस्त्यांना पाणी मिळणार आहे. काटकर मळा येथे नवीन पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्यामधून कुंभार मळा, कटकर वस्ती, डमकले वस्ती, जावलकर वस्ती, पंढरपूर रोडवरील वंचित असलेल्या सर्व परिसरांना शुद्ध नळाचे पाणी मिळणार आहे. दुसरी पाण्याची टाकी सिदोबा शेत येथे बांधण्यात येणार आहे. या टाकीमधून सिदोबा शेत परिसर, नळ मळा, मोरे मळा, काळा पट्टा व या परिसरातील वंचित भागांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची स्वच्छ पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार आहे, अशी माहिती सरपंच अमोल मोरे यांनी दिली. विकास मोरे, शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव पाटील, दत्तात्रय पाटील, अरविंद चव्हाण, मनोज नांगरे, श्रीरंग शिंदे, सागर ढोले, बाळासाहेब होनराव, मुन्नाभाई तांबोळी, प्रकाश मोरे, संजय वाघमारे, राहुल पांढरे, शेखर मिसाळ, माणिक नष्टे, देवेंद्र पुसावळे, योगेश नष्टे उपस्थित होते.