सांगली; पुढारी वृत्तसेवा : मिरजेतील अपेक्स रुग्णालय प्रकरणी डॉ. शैलेश शिवाजी बर्फे याला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली. सांगली जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
मिरजेतील अपेक्स कोरोना रुग्णालयात 87 जणांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत रुग्णालय चालक डॉ. महेश जाधव याच्यासह पंधरा जणांना अटक करण्यात आली होती. हृदयरोग तज्ञ व अपेक्स रुग्णालयाचा कन्सल्टंट डॉ. शैलेश बर्फे याच्यावर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
परंतु गुन्हा दाखल होताच डॉ. बर्फे याने सांगली जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला उच्च न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु उच्च न्यायालयाने देखील डॉ. बर्फे याचा जामीन अर्ज फेटाळल्याने महात्मा गांधी चौक पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली.