नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गानंतर आता शक्तिपीठ महामार्ग उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली माहूर, तुळजापूर, अंबाजोगाई ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. त्याचबरोबर औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंगे, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबरदेखील जोडले जाणार आहेत.
- या महामार्गामुळे राज्यातील यवतमाळ, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, बीड, परभणी, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग हे जिल्हे आणि पत्रादेवी (गोवा) हा भाग जोडला जाणार आहे.
- त्याद्वारे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथील तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनाला तसेच व्यापाराला चालना मिळणार आहे.
दृष्टिक्षेपात शक्तीपीठ महामार्ग
760 कि.मी.
एकूण लांबी
ग्रीनफील्ड, सहापदरी
महामार्गाचे स्वरूप
86,300 कोटी रुपये
अंदाजित खर्च
2028-29 पर्यंत
काम पूर्णत्वाला जाणार
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.