Latest

सचिन पिळगावकर : कोल्हापूरचे नाव ‘कलापूर’ करा

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : सचिन पिळगावकर यांनी कोल्हापूरचे नाव 'कलापूर' करा, अशी आग्रही मागणी आहे. कलापूर करण्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नुकत्याच एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एक मोठी मागणी केली आहे. चित्रपट महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी २००९ मध्ये चित्रनगरीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करताना चित्रनगरीला बाबुराव पेंटरांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र त्या घोषणेचे पुढे काहीच झाले नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकरांनीही मोठी मागणी केली आहे.

यावेळी बोलताना अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले की, "कोल्हापूर असे नाव त्या शहराचे कधीच नव्हते. चित्रपट निर्मितीचा गाव म्हणून त्या शहराचं ऐतिहासिकत्व आहे. अनेक कलावंतांनी तिथे चित्रपटक्षेत्रातील महत्त्वाचे पहिले-वहिले प्रयोग केले आहेत. याठीकाणी अनेक कलाकार तिथे घडले आहेत. त्यामूळे त्या शहराला लोक 'कलापूर' या नावानं ओळखंल जात होतं. इंग्रजांनी मुंबई शहराचे नाव उच्चारताना बदलून बॉम्बे असे केले होते.

अगदी त्याचप्रमाणे इंग्रजांनी 'कलापूर' शहराचा उच्चार वेगळा करत त्यांनी 'कोल्हापूर' असे नाव केले. त्यामुळे कोल्हापूर शहराचं नाव जे पूर्वीचं होतं तेच 'कलापूर' असे करावे, अशी मागणी सचिन पिळगावकरांनी यांनी केली आहे. यासाठी ते स्वतः प्रयत्न करणार असल्याचं देखील या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले.

कोल्हापूरला चित्रपटसृष्टीचे माहेर मानले जाते. भारतात चित्रपटसृष्टीचा पाया चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये घातला होता. पण, मराठी चित्रपटसृष्टीचा पाया कलानगरी कोल्हापूर शहरात बाबुराव पेंटर यांनी घातला. याचा अभिमान मराठी भाषिकांना आणि कलाकारांना नक्कीच आहे. कोल्हापूर चित्रनगरीला बाबूराव पेंटर यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती.

अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले की, आज सिनेमात अनेक बदल झाले आहेत. आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आलं आहे. डिजिटलायझेनही झाले आहे. आता पुर्वीसारखी मजा नाही. हे बदल मला मान्य नाहीत, असे नाही. हे बदल मी अजूनही शिकतो आहे.

सचिन पिळगावकर म्हणाले, आज प्रेक्षक खूप दक्ष झाले आहेत. प्रेक्षक जेवढे दक्ष होतील तेवढी कले मध्ये काम करणारी मानसे आपले टूल्स बदलत राहतील. आता काहीही करणे उपयोगाचे नाही कारण प्रेक्षक लगेच पकडतात, असेही सचिन म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT