मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये मुक्कामाला असून तेथे त्यांचा मुक्काम 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. सत्तेचा पेच सुटेपर्यंत आणखी काही काळ त्यांचा मुक्काम वाढू शकतो, असे सांगण्यात येत आहे.
पूर्वनियोजनानुसार 28 जूनपर्यंत हे हॉटेल आमदारांसाठी बुक करण्यात आले होते. आता त्याचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहेे. हे बंडखोर आमदार वगळता इतरांसाठी हॉटेलचे दरवाजे बंद आहेत.