आमदार उदय सामंत  
Latest

शिवसेना कमकुवत करण्याचे सहयोगी पक्षांचे कारस्थान : आमदार उदय सामंत

निलेश पोतदार

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा; गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले आहे. त्‍यांनी एक व्हिडिओ व्हायरल करून गुवाहाटीतून आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केल्‍याची त्‍यांनी म्‍हटले आहे.

त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

दरम्‍यान, एकनाथ शिंदे हे मुंबईला रवाना झाले आहेत अशा प्रकारच्या बातम्‍या येऊ लागल्‍या होत्‍या. मात्र गुवाहाटीला रॅडिसन हॉटेलमध्ये मुक्‍कामाला गेल्‍यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांनी हॉटेलबाहेर येत आपली भूमिका आज माध्यमांसमोर स्‍पष्‍ट केली. एकनाथ शिंदे यांनी सर्व ५० आमदार स्‍वत:च्या मर्जीने या ठिकाणी आले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्‍वासाठी आम्‍ही येथे आलो आहोत. आम्‍ही शिवसेनेतच आहोत. त्यमुळे महाराष्‍ट्रातील कार्यकर्त्यांनी कोणतीही काळजी करू नये. आम्‍ही लवकरच महाराष्‍ट्रात मुंबईत येऊ अशी भूमिका आज त्‍यांनी माध्यमांसमोर स्‍पष्‍ट केली.

एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही; गैरसमजाला बळी पडू नका असे आवाहन देखील त्‍यांनी यावेळी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसेनेने बळी पडू नये ही विनंती..

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT