Latest

शाहरूख खान याच्या मॅनेजरकडून गोसावी, प्रभाकरने घेतले ५० लाख

Arun Patil

मुंबई ; वृत्तसंस्था : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानची सुटका करण्यासाठी अभिनेता शाहरूख खान चा स्टाफ आणि साक्षीदार बनलेल्या काही जणांत मोठी डील झाली होती. त्यात किरण गोसावी आणि प्रभाकर साईलने शाहरूख खान ची मॅनेजर पूजा ददलानीकडून 50 लाख रुपयांची रक्कम टोकन म्हणून स्वीकारल्याचा गौप्यस्फोट या प्रकरणातील साक्षीदार सॅम डिसूझा याने सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

ड्रग्ज प्रकरणात सातत्याने नवनवीन माहिती समोर येत असून, प्रभाकर साईलच्या दाव्यानंतर आता सॅम डिसूझाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. किरण गोसावी आणि सॅम डिसूझा 25 कोटींच्या डीलवर बोलताना आपण ऐकले होते. या दोघांत 'एनसीबी'चे अधिकारी समीर वानखेडे यांना 8 कोटी देण्याचाही विषय झाल्याचा दावा प्रभाकरने नुकताच केला होता.

त्यावरही सॅम डिसूझाने खुलासा केला. गोसावी आणि प्रभाकर दुसराच खेळ करीत असल्याचा संशय त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी घेतलेले पैसे पुन्हा पूजा ददलानीकडे परत केले. 'एनसीबी'च्या अधिकार्‍यांना या डीलसंदर्भात काही माहिती नव्हती. गोसावी आणि प्रभाकरने संगनमताने हा प्लॅन आखला होता, असा दावा डिसूझाने केला.

आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज नव्हते, असे गोसावीने आपल्याला सांगितले. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. त्यावेळी हस्तक्षेपासाठी आम्ही राजी झालो. या प्रकरणातील वसुलीशी आपला काही संबंध नसून, सुनील पाटील नामक व्यक्तीचा फोन आला होता. त्यानेच क्रूझवर ड्रग्ज पार्टीची टीप 'एनसीबी'ला दिली होती. सरकारदफ्तरी पाटीलचा संपर्क दांडगा असून, त्याने 'एनसीबी'चे अधिकारी विश्वविजय सिंह यांच्याशीही संपर्क साधला होता, असेही डिसुझाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT