सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमनपद स्वीकारल्यानंतर मुंबईत खा. शरद पवार यांचे आभार मानताना आ. मकरंद पाटील व नितीन पाटील. 
Latest

शरद पवार म्हणाले, नितीन आधीच्या पण बोर्डात होता का?

Arun Patil

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या एका फोनने नितीनकाका पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन झाले. नितीनकाकांना घेऊन पवारांचे आभार मानण्यासाठी आ. मकरंद पाटील गेले असता 'नितीन आधीच्याही बोर्डात (संचालक मंडळात) होता का? असा कुतुहलात्मक सवाल पवारांनी मकरंद आबांना केला. लक्ष्मणतात्यांनी बँक सचोटीने चालविली.

नवी आव्हाने आली आहेत, तुम्हीही बँक तात्यांसारखी चालवा, असा उपदेश पवारांनी नूतन चेअरमन नितीनकाका पाटील यांना दिला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमनपदी नितीनकाका पाटील यांची निवड झाल्यानंतर आ. मकरंद पाटील, नितीनकाका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची मुंबईत जावून भेट घेतली. आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांनी पवारांचे चेअरमनपद दिल्याबद्दल आभार मानले.

खा. शरद पवार म्हणाले, सर्वकाही सुरळीत झाले ना? काही अडचण आली नाही ना? कुठे कटुता राहिली नाही ना? त्यावर आ. मकरंद पाटील म्हणाले, आपल्या फोनमुळे सर्व काही सुरळीत झाले. कुणीही चुकीचे वागले नाही. कटुताही राहिलेली नाही. त्यावर पवार म्हणाले, नितीन आधीच्याही बोर्डात होता का? त्यावर आ. मकरंद पाटील म्हणाले, तात्या असल्यापासून नितीन संचालक मंडळात आहे.

जिल्हा बँकेच्या कामकाजाचा अभ्यास चांगला आहे. बँकींग विषयीचे ज्ञान असल्यामुळे व तात्यांसोबत काम केल्यामुळेच या पदासाठी त्याने इच्छा व्यक्‍त केली. आपल्यामुळे हे शक्य झाले, असे मकरंद पाटील म्हणताच पवारांनी हसून दाद दिली.

नितीनकाकांकडे पहात खा. पवार म्हणाले, तात्यांनी बँक चांगली चालवली. सचोटीने व शिस्तबद्ध कारभार केला. तुम्हालाही बँक तशीच चालवावी लागेल. बँकींगमध्ये आता आव्हाने वाढली आहेत. कारखाने पूर्वी जिल्हा बँकेचे कर्जदार असायचे. आता तसे होत नाही. त्यामुळे तुम्हाला नवे कर्जदार शोधावे लागणार आहेत.

नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्यावर नितीनकाका पाटील म्हणाले, तुमच्या व मकरंद आबांच्या मार्गदर्शनाखाली बँक निश्‍चितच अशीच प्रगतीपथावर राहील. तुम्हाला अपेक्षित असलेले कामकाज माझ्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीत होईल. यावेळी संचालक शिवरुपराजे खर्डेकर, राजेंद्र राजपुरे, राजेश पाटील-वाठारकर हेही उपस्थित होते.

अजितदादांशीही चर्चा

खा. शरद पवार यांना भेटण्याच्या आदल्या दिवशी आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याशीही चर्चा केली. त्यांचेही आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT