जम्मू : पुढारी वृत्तसेवा वैष्णोदेवीच्या दर्शनाला येणार्या भाविकांचा 13 किमीचा फेरफटका आता वाचणार आहे. कटरा बेसकॅम्पच्या तारकोट ते सांझीछट असा नवीन रोप वे उभारणीचे काम हाती घेण्यात आले असून पहिल्या टप्प्याच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या रोपवेसाठी 250 कोटींहून अधिक खर्च येणार असून तो बांधल्यानंतर भाविक अवघ्या 6 मिनिटांत 13 किमीचा प्रवास करून वैष्णोदेवीच्या दरबारात पोहोचतील. कटरा ते माँच्या दरबाराचे हवाई अंतर 2.4 किमी आहे ज्यावर रोपवे बांधला जाणार आहे.
त्रिकुटा पर्वतात 5,200 फूट उंचीवर वसलेली वैष्णोदेवीची गुहा आहे. 2022 मध्ये 91 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी पवित्र गुहेला भेट दिली, त्यापैकी बहुतेकजण कटरा येथील बेस कॅम्पपासून सुमारे 13 किमी वर चढले. जम्मू-काश्मीर प्रशासनाने काल सुमारे 2.4 किमी लांबीच्या रोपवेच्या बांधकामासाठी निविदा जारी केल्या आहेत. ज्यामुळे प्रवासाचा वेळ फक्त सहा मिनिटांपर्यंत कमी होऊ शकतो, ज्यामुळे भाविकांचा वेळ आणि श्रम वाचू शकतात. बांधा, स्वत:चा, चालवा, हस्तांतरित करा या तत्त्वावर आधारित, हा रोपवे 36 महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक आहे. सवलतीचा कालावधी 33 वर्षे (बांधकामासह) असेल जो पुढील 10 वर्षांच्या कालावधीसाठी वाढविला जाऊ शकतो.
पायी अंतर : 13 किमी
कटरा ते मंदिर हवाई
अंतर : 2.4 किमी
रोप वेसाठी खर्च :
250 कोटी रु.
वाहतुकीची
क्षमता : 1500 व्यक्ती
कटरा येथे तारकोट ते सांझीछट रोपवे बांधणार
दर तासाला 1500 भाविक प्रवास करणार