Latest

विराटला प्रपोज करणारी डॅनियल वॅट अर्जुन तेंडुलकरसोबत डेटवर

Arun Patil

लंडन ; वृत्तसंस्था : काही वर्षांपूर्वी म्हणजे 2014 मध्ये विराट कोहलीला लग्‍नाची मागणी घालणारी इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट चक्‍क मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलासोबत लंच डेटवर गेली होती. डॅनियलने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला अर्जुनचा फोटो शेअर केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या रणजी करंडक स्पर्धेमध्ये अर्जुनला मुंबईच्या संघात स्थान मिळालेले नव्हते. त्यामुळे तो इंग्लंडमध्ये सुट्टी घालवत आहे. तिथे अर्जुन इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल वॅटसोबत लंच डेटवर गेला होता. डॅनियल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अर्जुनचा फोटो टाकला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला अर्जुन रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेताना दिसत आहे. डॅनियलची ही इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली.

डॅनियल वॅट आणि अर्जुन यांचा फोटो व्हायरल होताच अर्जुन आणि डेलिएलच्या प्रेमाची चर्चा रंगली आहे. व्हायरल झालेल्या फोटोत अर्जुनच्या ताटात अनेक रुचकर पदार्थ दिसत आहेत. या फोटोत वॅट दिसत नाहीय. पण तिच्याच मोबाइल कॅमेऱ्यामधून हा फोटो काढण्यात आल्याची शक्यता आहे. अर्जुन आणि डॅनियल वॅट दोघेही चांगले मित्र आहेत. अर्जुन लंडनमध्ये असताना नेहमीच वॅटला भेटतो. याआधी सुद्धा दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

डॅनियल वॅट आणि अर्जुन खूप दिवसांपासून एकमेकांचे मित्र आहेत. दोघेही एकमेकांचे कौतुक करत असतात. डॅनियल ही अर्जुनच्या गोलंदाजीची चाहती आहे. 2020 मध्ये तिने जाहीरपणे अर्जुनच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते. 31 वर्षीय डॅनियल वॅट इंग्लंडची तारांकित खेळाडू आहे. तिने इंग्लंडकडून 93 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात तिने सुमारे 1 हजार 500 धावा केल्या आहेत आणि 27 बळी मिळवले आहेत. 124 टी-20 सामन्यांमध्ये तिने जवळपास दोन हजार धावा आणि 46 बळी मिळवले आहेत.

अर्जुन हा इंग्लंडची महिला क्रिकेटपट्टू डॅनिएल सोबत फिरताना दिसत आहे. एका रेस्टॉरंटमधला हा फोटो आहे. जिथे डॅनियल आणि अर्जुन लंचसाठी गेले होते. डॅनियल वॅटने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये टाकला होता. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

माहितीनुसार, विराट कोहली डॅनियलच्या आवडत्या क्रिकेटपटूपैकी एक आहे. डॅनियलने याआधी विराट कोहलीला लग्नासाठी सुद्धा प्रपोज केला होता. त्यावेळी ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. डॅनियल वॅट तेंडुलकर कुटुंबाला चांगली ओळखते.

2009-10 साली ती लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा भेटली होती. डॅनियल वॅटची सचिनशी ओळख झाली. त्यावेळी अर्जुन तेंडुलकर अवघ्या 10 वर्षांचा होता. वॅट तेंडुलकर कुटुंबासोबत चांगले संबंध ठेऊन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT