कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, आ. प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, राहुल आवाडे, इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी, जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉ. नीता माने, पन्हाळा नगराध्यक्ष रूपाली धडेल, हुपरीच्या नगराध्यक्ष जयश्री गाट आदी उपस्थित होते.(छाया : पप्पू अत्तार) 
Latest

विधान परिषद निवडणूक : अनेकांच्या काढलेल्या कळा पालकमंत्र्यांना महागात पडणार

अमृता चौगुले

विरोधी उमेदवाराने गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकांच्या कळा काढल्या आहेत. शिवाय जिल्ह्यातील काही जणांना मंत्री, पालकमंत्री व्हायचे आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलले आहे. या सर्वांची किंमत मंत्री सतेज पाटील यांना निवडणुकीत मोजावी लागेल, असा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी दिला. विधान परिषदेच्या निवडणुकीत ( विधान परिषदेच्या निवडणूक ) आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे यांच्यासारखे दिग्गज आमच्यासोबत असल्यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

भाजपचे उमेदवार अमल महाडिक ( विधान परिषदेच्या निवडणूक ) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजप आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अमल महाडिक यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीस जनसुराज्य शक्ती पक्षाचे आ. विनय कोरे नियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत.

यावेळी महाडिक म्हणाले, विधान परिषदेतील ( विधान परिषदेच्या निवडणूक ) विजयासाठी लागणार्‍या संख्याबळाच्या जवळ आपण गेलो आहोत. या निवडणुकीत आपणास मताधिक्य मिळणार, यात शंका नाही. या निवडणुकीला अनेक पैलू आहेत. भाजप सरकारच्या कालावधीत नव्या नगरपालिका स्थापन करण्यात आल्या. यामध्ये बहुतांशी भाजपचे कार्यकर्ते निवडून आले आहेत. त्यामुळे 'मॅजिक फिगर' आपण पार करणार आहोत.
कोणाला मंत्री व्हायचे आहे,

तर कोणाला पालकमंत्री व्हायचेय ( विधान परिषदेच्या निवडणूक )

विरोधातील उमेदवाराने पाच-सहा वर्षांत अनेकांच्या कळा काढल्या आहेत. त्याची भरपाई त्यांना या निवडणुकीत करावी लागणार आहे. जिल्ह्यातील काही लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कोणाला मंत्री व्हायचे आहे, तर कोणाला पालकमंत्री व्हायचे आहे. त्याचे पडसाद या निवडणुकीत दिसणार आहेत. महाविकास आघाडीचे नेते उमेदवारांसोबत फिरत आहेत. परंतु मतदार स्वयंभू आहेत, ते निर्णय घेण्यास तयार आहेत. रोज यांनी पाठिंबा दिला, त्यांनी पाठिंबा दिले, असे विरोधक सांगत आहेत. मतदारांना आमिष दाखवत आहेत. दबावही आणत आहेत. पण या निवडणुकीत चित्र बदलले असल्याचा दावा महाडिक यांनी केला.

आणखी 43 मते मिळवावी लागतील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या निवडणुकीत आ. कोरे व आ. आवाडे त्यांच्याकडे होते. यावेळी हे दिग्गज नेते आमच्याकडे आहेत. हा दोन्ही निवडणुकांतील महत्त्वाचा फरक आहे. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे. सध्या सकाळी विरोधी आघाडीच्या उमेदवारासोबत फोटो काढणारे सायंकाळी धनंजय महाडिक यांच्यासोबतही फोटो काढतात. असे चालायचेच. परंतु आकडेवारी पाहिली, तर भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्यांची संख्या 105 आहे. आ. कोरे व आ. आवाडे यांचे मतदार मिळून सध्या भाजपकडे असणार्‍या मतदारांची संख्या 165 आहे. आणखी 43 मते मिळवावी लागतील. ही मते मिळविणे सोपे असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

बैठकीस आ. प्रकाश आवाडे, माजी आ. सुरेश हाळवणकर, उमेदवार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, इचलकरंजी नगराध्यक्षा अलका स्वामी, जयसिंगपूर नगराध्यक्षा डॉ. नीता माने, पन्हाळा नगराध्यक्षा रूपाली धडेल, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, जि.प. सदस्य अरुण इंगवले, शौमिका महाडिक, राहुल आवाडे, प्रसाद खोबरे आदी उपस्थित होते.

केवळ एका जागेवर बिनविरोध

विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचालींबाबत विचारले असता, त्यांनी केवळ काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नीना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. सातव यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे केवळ या जागेवर आम्ही उमेदवार उभा न करण्याचे ठरविले असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

अमल महाडिक यांच्याकडे २० कोटींची मालमत्ता

विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे 20 कोटींची मालमत्ता आहे. उमेदवारी अर्जासमवेत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या नावे त्यांच्या कुटुंबाकडे असलेली मालमत्ता 21 कोटींवर आहे.

महाडिक यांच्याकडे 1 लाख 64 हजार रुपये इतकी रोख रक्कम आहे. 6 लाख 37 हजारांच्या ठेवी तसेच 79 लाखांचे शेअर्स तसेच पोस्ट, एनएसएस आदी ठिकाणी 18 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. महाडिक यांनी विविध कंपन्या, ट्रस्ट तसेच मित्र, कुटुंबे आदींना 8 कोटी 49 लाख इतकी रक्कम कर्ज स्वरूपात दिल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

महाडिक यांच्याकडे 25 लाखांचे दागिने, एक चारचाकी आहे. त्यांच्याकडे 6 कोटी 29 लाख रुपयांची शेतजमीन तर बिगरशेती असलेली सुमारे 1 कोटी 96 लाख रुपये किमतीची जागा आहे. महाडिक यांच्यावर 4 कोटी 93 लाख रुपयांचे कर्जही आहे. त्यांच्या नावावर कोणतेही गुन्हे नाहीत, तसेच त्यांना न्यायालयाने कोणत्याही गुन्ह्यात शिक्षा ठोठावलेली नाही, असेही या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT