Latest

वाढता उष्म्यात कोंबड्यांची अशी घ्या काळजी

Shambhuraj Pachindre

उन्हाळ्यात कोंबड्यांच्या आहाराबाबत आणि व्यवस्थापनातबाबत पुरेशी काळजी न घेतल्यास खालील दुष्परिणाम दिसतात. कोंबड्यांच्या अंडी देण्याच्या आणि अंडी उबविण्याच्या क्षमतेत कमीपणा येतो. तसेच काही वेळा कोंबड्यांच्या अंड्यांचा आकार लहान होतो. अंड्यांच्या कवचाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची होते. व्यवसायावर थेट परिणाम करणारी ही लक्षणे दिवसण्याअगोदर कोंबड्या उष्णतेचा त्रास जाणवत असल्यास काही लक्षणे दाखवितात. त्याच वेळी उपाययोजना केल्यास पुढे होणारे आर्थिक नुकसान टाळता येते.

उष्णतेची सुरुवातीची लक्षणे :

कोंबड्यांना उष्णतेचा त्रास जाणवल्यास त्या शांतपणे उभ्या राहतात. त्यांच्याकडे मंदपणा आणि सुस्तपणा दिसून येतो. त्या जास्त पाणी पितात आणि खाद्य कमी प्रमाणात खातात. काही कोंबड्या पाण्याच्या भांड्याजवळ मान वाकवून उभ्या राहतात, तर काही कोंबड्या भिंतीचा आडोसा घेऊन शांतपणे उभ्या राहतात. शरीरातील वाढलेल्या उष्णतेला कमी करण्यासाठी आणि थंडपणा आणण्यासाठी कोंबड्या त्यांचे पंख शरीरापासून दूर पसरवितात. उष्णतेचा त्रास आणखी वाढल्यास कोंबड्या तोडांची सतत उघडझाप करतात आणि धापा टाकतात.

– मिलिंद सोलापूरकर

  • उन्हाळ्यातील व्यवस्थापन असे हवे कोंबड्यांच्या शेडमध्ये हवा खेळती ठेवावी.
  • उष्माघातापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारच्या आच्छादित भिंत आणि छताच्या शेडमध्ये ठेवावे.
  • छताला पांढर्‍या रंगाने रंगवावे. हे शक्य नसल्यास छतावर वाळलेल्या गवताच्या पेंड्या, भाताचा कोंडा टाकावा आणि त्यास ओले ठेवावे.
  • त्यामुळे शेडमधील तापमान कमी होते.
  • तसेच उन्हाळा सुरू झाल्यावर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये अचानकपणे बदल करून नये.
  • कोंबड्या जास्त पाणी पितात म्हणून पाण्याची भांडी 50 टक्क्यांनी वाढवावीत.
  • शेडमध्ये पक्ष्यांची अधिक घनता असेल तर ती कमी करावी.
  • कोंबड्यांचे लसीकरण करावयाचे असल्यास सकाळच्या वेळी करावे. लसींची साठवण योग्य तापमानावर करावी कारण उन्हाळ्यात लस नष्ट होण्याचा धोका असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT