वाई : पुढारी वृत्तसेवा
पाचवड (ता. वाई) गावच्या हद्दीत अवैध लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी वनविभागाने धडक कारवाई केली. लाकडाने भरलेला टेम्पो वनविभागाने ताब्यात घेतला असून टेम्पोसह माल जप्त करण्यात आला आहे.
संशयित आरोपी स्वप्नील प्रकाश बांदल (वय 28, रा. अमृतवाडी, पाचवड ता.वाई) याने टेम्पो (क्र. एमएच 11 – एल 5988) मधून विनापरवाना रायवळ जातीच्या लाकडाची वाहतूक केली. लाकडाने भरलेला हा टेम्पो वनविभागाने ताब्यात घेतला असून टेम्पोसह माल जप्त करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत 5 लाख 50 हजार एवढी असून त्याची सखोल चौकशी सुरु आहे.
एका महिन्यात वाई वनविभागाने अनेक वेळा अवैध लाकडाची वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई केली आहे. माल व टेम्पो वनक्षेत्रपाल कार्यालय वाई यांच्या आवारात लावण्यात आलेला आहे. वनरक्षक बेलमाची यांनी गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली वाई वनक्षेत्रपाल स्नेहल मगर, वनपाल भुईंज संग्राम मोरे, वनरक्षक भुईंज संजय आडे यांनी केली.