Latest

वसईची गिर्यारोहक हर्षाली वर्तकने केले माऊं ट सतोपंथ सर

अमृता चौगुले

खानिवडे : पुढारी वृत्तसेवा :  वसईतील हर्षाली अशोक वर्तक या महिला गिर्यारोहकीने माऊंट सतोपंथ हे हिमालयाच्या गढवाल क्षेत्रातील प्रमुख शिखरांपैकी एक असलेले शिखर सर केले आहे. हे शिखर भारतीय उपखंडात येत असून गंगोत्री राष्ट्रीय उद्यानातील हे दुसरे शिखर आहे. तब्बल 22 दिवसांच्या असलेल्या मोहीमेत तिच्या सोबत दहा जण होते. माऊं ट सतोपंथ हे हे 7075 मीटर उंच शिखर पादाक्रांत केल्यामुळे तिच्यावरती सध्या वसईतून व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इंडियन माऊंटनेअरिंग फाऊं डेशनच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात आली होती.

त्यासाठी तिने शिवा एडवेंचरमार्फत मोहिमेअगोदर एक महिना नोंदणी केली होती. याअगोदर हर्षालीने मांऊट फ्रेडशिप, मांऊट
हनुमान टिब्बा, मांऊट युनाम, माऊंट मेंनथोसा, मांऊट डी. के. डी, मांऊट फुजी, मांऊट किलीमंजारो, मांऊट इलंब्रुस, मांऊट चंद्रभागा -14 अशा एकाहून एक सरस मोहीम तिने
यशस्वी पार केलेल्या आहेत. कंचनगंगा शिखर सर करण्याचा तीच स्वप्न आहे. हर्षालीने सर केलेल्या मांऊट सतोपंथ ला प्रि. एवरेस्ट असेही बोलतात.

एवरेस्ट करण्या आधी ही मोहीम प्रत्येक गिर्यारोहक करत असतात. याअगोदर देश-विदेशातील दहा अवघड मोहिमा तिने लीलया पार केल्या आहेत. माऊं टन सतोपंथ ही मोहीम हर्षालीने 25 ते 17 जून दरम्यान उत्तर काशी येथे सर केली होती.तिच्या सोबत आसाम, बेंगलोर, डेहराडून, उत्तरकाशी व ती स्वतः मुंबईतील असे दहा जण होते. त्यात आसाम मधून एक महिला गिर्यारोहक व दुसरी शेर्पा म्हणून उतर काशीतील महिला तिच्या सोबत होती.

नैसर्गिक बदलांचा करावा लागला सामना… तब्बल बावीस दिवसांच्या या मोहिमेत अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं . उत्तरकाशी ते गंगोत्री हा शंभर किलोमीटरचा प्रवास करून 26 मे रोजी हर्षालीने भुजवासा ट्रेकला सुरुवात केली .त्यानंतर नंदनवन ट्रेक, वासुकीताल ट्रेक असे विविध ट्रेक सर करत त्यांनी ही मोहीम पूर्ण केली होती. क्षणाक्षणाला बदलत जाणारे वातावरण, होणारा हिमवर्षाव, हिमस्खलन या नैसर्गिक बदलांना सामोरे जात त्यांनी ही मोहीम पार केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT