मोतिहारी, वृत्तसंस्था : बिहारच्या मोतिहारीमध्ये एक लग्नात मोठा गोंधळ झाला. नवर्या मुलाने वधूची पाठवणी करत असताना तिच्या कौमार्य चाचणीची मागणी केली. यानंतर संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी नवर्या मुलाला दोन दिवस बंदी बनवले. त्यानंतर पोलिस आणि स्थानिकांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण निवळले. मात्र वधूने वरासमवेत जाण्यास नकार दिला.
ही घटना तुरककौलिया पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्या चारगाह येथील आहे. 16 नोव्हेंबर रोजी एका मुलीचे सूरज बैठा नावाच्या मुलाबरोबर लग्न होते. लग्न धूमधडाक्यात झाले. मात्र दुसर्या दिवशी वधूच्या पाठवणीच्या दिवशी वधू आणि वराच्या नातेवाईकांमध्ये भांडण सुरू झाले. त्यावेळी वधूच्या कुटुंबीयांनी तिला सासरमध्ये त्रास होऊ नये, कागदोपत्री लिहून देण्यास वराच्या कुटुंबीयांना सांगितले. यावर नवरा मुलगा नाराज झाला आणि त्याने वधूच्या कौमार्य चाचणीची मागणी केली.