Latest

लसीकरण : केंद्राने केली नवी नियमावली जाहीर

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : तिसर्‍या डोसबाबत (लसीकरण) केंद्राने नवी नियमावली मंगळवारी जारी केली. देशात 10 जानेवारीपासून 'को-मॉर्बिडिटी'ग्रस्त (गंभीर आजार असलेल्या) 60 वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरच्या प्रमाणपत्राशिवाय 'प्री-कॉशन' डोस देण्यात येणार आहे.

साठ वर्षांवरील नागरिकांनी तिसरा डोस (लसीकरण) घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला मात्र जरूर घ्यावा, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते. 3 जानेवारीपासून 15 ते 18 दरम्यानच्या वयोगटाला डोस देण्यात येतील. त्यासाठी आधी ऑनलाईन नोंदणी करावी लागेल किंवा लस उपलब्धतेनुसार केंद्रांवर ऐनवेळीही नोंदणी करून डोस देण्यात येईल.

लसीचा दुसरा डोस घेऊन 9 महिने झालेल्यांना प्री-कॉशन डोससाठी नोंदणी करता येईल. निवडणुका होत असलेल्या उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील निवडणूक कर्मचार्‍यांना आता फ्रंटलाईन वर्कर्सच्या श्रेणीत घेण्यात आले आहे. म्हणजेच हे कर्मचारीही बूस्टर डोससाठी पात्र ठरणार आहेत.

'को-मॉर्बिडिटी' यादी

मधुमेह, किडनीचे आजार वा डायलिसिस, कार्डियोव्हॅस्क्युलर, स्टेमसेल ट्रान्सप्लान्ट, कर्करोग, सेरॉयसिस, सिकल सेल, इम्युनोस्प्रॅसेंट ड्रग्जवर असणे, मॉस्क्युलर डिस्ट्रॉफी, रेस्पिरेट्री सिस्टीमवर अ‍ॅसिड अ‍ॅटॅक, बहुव्यंग, रेस्पिरेट्री डिसिज्मुळे 2 वर्षे रुग्णालयात दाखल असलेेले. हे आजार असतील तर सरळ 'खबरदारीचा डोस' घेता येईल.

वृद्धांना 'प्री-कॉशन' डोससाठी प्रमाणपत्र गरजेचे नाही
15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना थेट केंद्रांवरही नोंदणीस परवानगी
निवडणुका असलेल्या राज्यांतील निवडणूक कर्मचारी फ्रंटलाईन श्रेणीत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT