Latest

लवकरच मुंबईतील दाट वस्तींमध्ये अग्निशमन जवान असणार तैनात; २४ तास सेवा देणार

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वत्तसेवा :  मुंबईतील झोपडपट्ट्यांतील दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते याठिकाणी पोहचण्यास विलंब होणाऱ्या अग्निशमन दलाला अशा ठिकाणी २४ तास अग्निशमन गाडीसोबत तैनात राहावे लागणार आहे. २२ विभाग कार्यालयांची निवड करण्यात आली असून मे महिन्यामध्ये या गाड्या सेवेत येतील. त्यामुळे आपत्कालिन प्रसंगी तातडीने मदत मिळण्यास मदत होईल.

महापालिकेच्या अग्रिशमन विभागाने २२ वाहनांची खरेदी आणि प्रशिक्षित जवानांच्या मनुष्यबळासह पुरवठा करण्यासाठी आर्यन पंप्स अॅण्ड  एन्वायरो सोल्यूशन्स या कंपनीकडून सुमारे १८१ कोटी खर्च केले जाणार आहेत. मे २०२३ पर्यंत ही सर्व अग्निशमन वाहने विभाग कार्यालयांमध्ये तैनात असतील. या वाहनांचा उपयोग अग्निशमन व विमोचन कार्यासाठी होणार आहे. ही वाहने महापालिकेच्या २२ विभाग
कार्यालयांमध्ये तैनात करण्यात येतील. एखाद्या विभागाच्या हद्दीमध्ये दुघर्टना घडल्यास ही वाहने प्रथम प्रतिसादात्मक वाहने म्हणून दुर्घटनास्थळी पोहोचतील व अग्रिशमन दलाची नियमित वाहने पोहोचेपर्यंत मदत कार्याला सुरुवात करतील. ज्यामुळे नागरीकांना जास्त प्रभावीपणे सेवा देणे शक्य होईल. तसेच जीवित व वित्तहानी कमी होण्यास मदत होईल.

यांचा असणार समावेश

प्रत्येक वाहनांमध्ये एक चालक, एक सुपरवायझर, २ प्रशिक्षित अग्निशामक व सुपरवायझर असणार आहे. चालक हा एसएफटीसी मुंबई, एनएफएससी नागपूर किंवा सरकार मान्यप्राप्त संस्थेमधून सहा महिन्यांचा अग्रिशमन अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल. वाहनांमध्ये पाणी व फोम टँक, वॉटर मिस्ट फायटींग सिस्टीम, पीटीओ, विमोचन उपकरणे, श्वसन उपकरण असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT