लक्ष्मीपूजन 
Latest

लवंगी मिरची : सण वर्षाचा, हर्षाचा!

दिनेश चोरगे

का हो वहिनी? रागावलेल्या दिसताय?
आमची कार्टी रागाला आणतात ना. सारखं आपलं फटाके आण, फटाके आण, चाललंय.
मग आणा की थोडे.
नसते खर्च वाढवतात कार्टी.
दिवाळी म्हटल्यावर पैशाला हात सैल सोडावा लागणारच की थोडासा.
पैसे घालवून तरी मिळवणार काय? आवाजाने डोकं उठवणार, मग अंगणात, कचरा वाढवणार.
मग त्यांना आवरायला लावा तो. अर्धा, एक तास फटाक्यांचे आवाजही करू द्या.
नुसतं तेवढंच नाहीये. फटाक्यांमुळे प्रदूषण किती होतं? तिकडे दिल्ली सरकारने तर फटाके वाजवण्यावर बंदीच घातलीये ना यंदा?
कबूल आहे; पण फटाके बनवणारे, विकणारे, त्यातून पोट भरणारे पण बरेच लोक आहेत ना आपल्याकडे? त्यांचा विचार करायला नको?
तुम्ही फटाकेप्रेमी दिसताय!
माझं सोडा. फटाके वाजवताना पोरं किती खूश असतात, सांगा. धावपळ, आरडाओरडा, किंचाळ्या ह्यांनी दणाणून सोडतात सगळं. तसा आनंद त्यांनी कधी घ्यायचा एरवी?
फराळाचे जिन्नस हादडतात की मनसोक्त.कुठले तरी पेढे, बर्फी खाऊन पोटं बिघडवून घेतली की उघडतात त्यांचे डोळे.
म्हणजे त्यांनी पेढे, बर्फी खायलाच नको का ?
सगळं भेसळयुक्त असतं हो ह्या सणासुदीला
खाण्याच्या आनंदावरही फुली मारताय का?
फुली म्हणजे फुलीच नाही अगदी; पण
त्यातले धोके सांगतेय. त्यातल्या त्यात कपडे
खरेदीच बरी वाटते मग. ह्या दिवसात सेलही लागलेले असतात.
पण सेलचा माल दोन नंबरचा असतो. आधी त्याच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवून नंतर उगाच दरकपात केल्यासारखं दाखवतात.
तसा अनुभव तर येतोच वरचेवर! पण नवे कपडे घालून मिरवायचं असतंच ना प्रत्येकाला.
तेच म्हणतोय. प्रत्येक गोष्टीत काही ना काही खोट आहे; पण प्रत्येकावर कोणाचं ना कोणाचं पोटही आहे. केवळ घाटा दिसतो आहे म्हणून मग काहीच करायचं नाही का आपण?
तसं थोडंफार साजरं करतोच जो, तो माणूस.
मग ते अगदी मनापासून,आनंदाने केलेलं बरं नाही का? एवढा वर्षाचा,
हर्षाचा सण आलाय! असंख्य अडचणी, संकटं पार करत इथवर आलोय, तर चला आनंदाने सण साजरा करूया.

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT