Latest

लक्ष्मीची पाऊले : विकासात दूरसंचार क्षेत्राचा मोठा वाटा

अमृता चौगुले

गेल्या आठवड्यात सर्वसाधारणपणे शेअर बाजारात जरी नरमाई असली तरी पद्धतशीर गुंतवणूक योजना पद्धतीचे निवेशकांना आकर्षण होते. (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन डखझ) आता अशा निवेशकांची गुंतवणूक 1.24 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या काही महिन्यांत ही वाढ 30 टक्क्यांवर गेली आहे. पद्धतशीर गुंतवणूक योजना म्हणजे एक प्रकारे गुंतवणूकदारांनी आपल्याला लावून घेतलेली शिस्त आहे.

उदा. पुढील 24, 30, 36 अगर 60 महिने अशी आपल्याला सोयीस्कर मुदत जी वाटेल ती ठरवून त्यात दरमहा अगर काही ठरावीक काळात आधीच ठरवलेली रक्कम गुंतवावी लागते.  त्यामुळे दर शेअरची सरासरी किंमत आपोआप ठरते. उदा. लार्सेन टुब्रो दरमहा 100 शेअर्स घ्यायचे ठरवले, आणि गेल्या तीन महिन्यांत अनुक्रमे शेअरची किंमत 1700 रु., 1720 रु. आणि 1740 रु. अशी झाली असेल तर खरेदीची सरासरी दर शेअरमागे 1720 रु. पडते. त्यापुढे वाढणारे भाव सतत नफाच देऊन जातील. पूर्वी मध्यम वर्गातील अनेकजण दर महिन्याला 1 मासा, 2 मासे अगर 3 मासे सोने घ्यायचे त्यामागे हीच कल्पना होती/आहे.

पेट्रोल जसजसे महाग होत आहे तसतसे त्यात उसापासून निघणारे इथेनॉल जास्त प्रमाणात वापरण्याची आता अनेकांनी सवय लागू लागली आहे. इंधनाची आयात वाढत्या दराने करण्याऐवजी इथेनॉलचे प्रमाण हळूहळू पुढील 5 वर्षे वाढवत जावे, असे केंद्र सरकारने ठरवले आहे. आधीच्या काळात इथेनॉलचे प्रमाण पेट्रोलमध्ये 30 टक्क्याने वाढवावे असे धोरण होते, पण आता ही मुदत केंद्राने 5 वर्षे अलीकडेच आणली आहे. ब्राझीलसारख्या देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे धोरण गेली अनेक वर्षे आधीच आखले गेले आहे. सुदैवाने आपल्याकडे कोल्हापूर, सांगली जिल्हे व उत्तर प्रदेशमध्ये अनेक जिल्हे हे धोरण यशस्वीरित्या राबवीत आहेत. प्राज इंडस्ट्रीजचे श्री. प्रमोद चौधरी यांनी अनेक वर्षांपूर्वीच यातील रहस्य ओळखले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या एका समितीने गेल्या आठवड्यात राष्ट्रीय जैव इंधनाच्या धोरणात काही दुरुस्त्या करण्याचे ठरवले आहे.

वाढती महागाई व रशिया-युक्रेन युद्धामुळे आता 'एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज'ने भारताचा आर्थिक वृद्धीदर 7.3 टक्के राहील, असे सूचित केले आहे. गेले काही महिने महागाई सतत वाढत आहे व ती यापुढेही सतत वाढत राहील, अशी चिन्हे दिसत असल्याने रिझर्व्ह बँकेला बहुधा यापुढे आपला रेपोदर हळूहळू; पण थोडा थोडा वाढवावा लागणार आहे. रेपोदर जसजसा वाढत राहील तसतशी महागाई आटोक्यात येईल, असे अनेकांना वाटते.

खनिज तेल, धातू, क्रूड पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (नॅचरल गॅस), अन्न धान्य, रासायनिक उत्पादने यांच्या वाढत्या किमतीमुळे एप्रिल 2022 मध्ये, मागील काही वर्षांच्या एप्रिल महिन्यांपेक्षा महागाईचा दर जास्त राहिला आहे.
महागाई कितीही वाढत असली तरी महागाईच्या चटक्यांबरोबर उन्हाचे चटकेही वाढत गेले. त्यामुळेे एसी (वातानुकूलित) इन्व्हर्टर यांना मागणी सतत वाढली. देशात काही ठिकाणी तर उष्णतामान 45 डिग्री सेंटिग्रेडच्या वर गेले.

सध्या आपली आर्थिक व्यवस्था सुद़ृढ असल्यामुळेच यशस्वीरित्या आपण या कठीण परिस्थितीचा मुकाबला करत आहोत. आपले कॉर्पोरेट जग सुद़ृढ असल्याने हे शक्य होत आहे. चेपशू आणि चरपरसशाशपीं यांचे शिक्षण नवीन पिढी घेत आहे. सध्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये दूरसंचार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या या क्षेत्रात 117 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळे आपले दूरसंचार क्षेत्र जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. रिझर्व्ह बँक दरवर्षी आपला नफा मे, जूनच्या सुमारास केंद्र सरकारला देत असते. यावर्षी 30,300 कोटी रुपये रिझर्व्ह बँक केंद्र  सरकारला देणार आहे.

एन. टी. पी. सी. (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) ने या आर्थिक वर्षाच्या 4 थ्या तिमाहीत 5167 कोटी रुपये नफा दाखवला आहे. गेल्या वर्षीच्या दाखवलेल्या नफ्यापेक्षा यावेळचा नफा 14 टक्के जास्त दाखवला आहे. यावेळचा या तिमाहीचा महसूल 23 टक्क्याने वाढून तो 37000 कोटी रुपये असेल.

-डॉ. वसंत पटवर्धन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT