Latest

रश्मिका झळकणार टायगरसमवेत!

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पुष्पा' चित्रपटामुळे हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय झालेली दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आता हिंदीतही सक्रिय झाली आहे. लवकरच ती टायगर श्रॉफबरोबर एका चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक शशांक खेतान यांनी या दोघांना आपल्या एका अ‍ॅक्शन ड्रामा मुव्हीसाठी कास्ट केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरपासून सुरू होईल. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे.

हा चित्रपट अॅक्शन, रोमान्स आणि साहसाने भरलेला चित्रपट असेल, ज्यामध्ये टायगरची दमदार अॅक्शन आणि रश्मिका मंदान्नासोबतचा अभिनेत्याचा रोमान्स पाहायला मिळणार आहे. टायगर आणि रश्मिकाच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी ट्रीट असणार आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये चित्रपट सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रश्मिकाकडे आधीच 'मिशन मजनू' आणि 'गुडबाय' असे दोन बॉलिवूड चित्रपट आहेत. या चित्रपटांमधून रश्मिका बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. ती 'मिशन मजनू'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि 'गुडबाय'मध्ये अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या उत्तरार्धात प्रदर्शित झालेल्या रश्मिकाच्या 'पुष्पा-द राइज' चित्रपटाने भरपूर कमाई केली होती. रश्मिका ज्या चित्रपटात काम करते, तो चित्रपट सुपरहिट होतो. रश्मिकाने तिच्या करिअरमध्ये सलग सात हिट चित्रपट दिले आहेत. आता रश्मिकाचा बॉलिवूडमध्ये काय कमाल करते हे पाहू.

रश्मिका सध्या दक्षिणेतही तेथील सुपरस्टार अभिनेत्यांसमवेत काम करीत आहे. लवकरच ती थलपती विजयसमवेत त्याच्या एका आगामी चित्रपटात दिसणार आहे. टायगर श्रॉफ लवकरच अक्षयकुमारबरोबर 'छोटे मियाँ बडे मियाँ' या चित्रपटात दिसेल. सध्या तो 'गणपत' या चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. रोहित धवनच्या 'रॅम्बो'मध्येही टायगर झळकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT