Latest

रशिया-युक्रेन युद्ध : 8 रेल्वे रुग्णालयांनी वाचवले 400 जीव

Arun Patil

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) दोन महिने उलटून गेले आहेत. नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी युक्रेनने 8 सीक्रेट रेल्वे चालवल्या असून यातून आतापर्यंत 400 जणांची जीव वाचवण्यात आला आहे. बाहेरून निळा आणि पिवळा रंग असलेल्या या रेल्वे सोव्हियत काळातील रेल्वेपैकी आहेत. युद्धक्षेत्रातील लाखो स्थलांतरित आणि जखमी जवानांना मदत करण्याचे काम या रेल्वेद्वारे केले जात आहे.

कीव्हमध्ये भारतीय दूतावास पुन्हा सुरू (Russia Ukraine War)

कीव्ह येथे पुन्हा अनेक देशांनी त्यांच्या दूतावासांचे काम सुरू केले आहे. भारतीय दूतावास देखील पुन्हा कार्यरत झाला आहे. युद्धाला सुरुवात झाल्यापासून भारतीय दूतावासाचे काम पोेलंडची राजधानी वॉरसॉ येथून सुरू होते.

स्वीडन, फिनलँडच्या 'नाटो' सदस्यत्वास तुर्कीचा विरोध (Russia Ukraine War)

दरम्यान, स्वीडन आणि फिनलँड यांना 'नाटो'चे सदस्यत्व देण्यावरून तुर्कीने खोडा घातला आहे. अंकारा येथील पत्रकार परिषदेत तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैयप एर्दोगन म्हणाले की, स्वीडन आणि फिनलँड तुर्कीवर निर्बंध लावत असतील तर नाटोतील त्यांच्या प्रवेशास आम्ही मंजुरी देणार नाही. या देशाच्या मुत्सद्यांनी आमचे मन वळवण्यासाठी तुर्कीला येण्याचे कष्ट घेऊ नयेत. स्वीडन हा देश दहशतवादी संघटनांचे घरटे आहे. नॉर्वे, डेन्मार्क आणि आईसलँडने स्वीडन आणि फिनलँड यांना नाटोचे सदस्यत्व मिळण्याधीच सुरक्षिततेची गॅरंटी दिली आहे.

अशा आहेत रेल्वे 

आठ गाड्यांचे तीन आठवड्यांत चालत्या-फिरत्या अत्याधुनिक रुग्णालयात रूपांतर
प्रत्येक रेल्वेत पाच आयसीयू युनिट
हवा शुद्ध ठेवण्यासाठी
7 ऑक्सिजन जनरेटर
रेल्वे आणि आरोग्य मंत्रालयाकडून या रेल्वे रुग्णालयाचे संचालन
मेडिकल फ्रंटियर्सच्या टीमकडून 24 तास निगराणी
रुग्णाला बेडसह दाखल करता यावे यासाठी दरवाजांची रचना मोठी
जखमी नागरिकांसांठी आठ बेड्सच्या दोन गाड्या दिल्या आहेत.

* युद्धामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी युक्रेन आणि जपान यांच्यात 10 कोटी डॉलरच्या कर्जाचा करार.
* मारियुपोल येथील अझोवस्टल पोलाद प्रकल्पात अडकलेल्या 260 सैनिकांना बाहेर काढण्यात आले आहे.
* रशियन खनिज तेलाच्या आयातीस बंदीबाबत अद्याप युरोपियन संघात मतैक्य झालेले नाही.
* दुसर्‍या महायुद्धानंतर नागरिकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी पहिल्यांदाच लोकांच्या सेवेसाठी या रेल्वेचा वापर करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT