इस्लामाबाद : तिहार तुरुंगात असलेला दहशतवादी यासिन मलिकची पत्नी मुशालचा पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानात अन्वर उल हक काकर यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे हंगामी मंत्रिमंडळ आकाराला आले असून गुरुवारी १८ मंत्र्यांचा शपथविधी झाला.
पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत जलील अब्बास जिलानी यांची परराष्ट्र मंत्रिपदी तर सेंट्रल बँकेचे माजी प्रमुख शमशाद अख्तर यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. मानवाधिकार खात्याच्या मंत्रिपदी भारतात तुरुंगात असलेला कुख्यात दहशतवादी यासिन मलिक याची पत्नी मुशल हुसेन मलिक यांची नियुक्ती केली जाणार आहे. मुशाल हुसेन या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीधर झालेल्या आहेत.