Latest

यजुवेंद्र चहलचा संसार फुटीच्या उंंबरठ्यावर?

दिनेश चोरगे

टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. धनश्री स्वतः कोरिओग्राफर असल्याने अनेकदा ती भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसोबतसुद्धा रील्स बनवते. काही दिवसांपूर्वी तिने श्रेयस अय्यरसोबत एक डान्स रीलही केला होता. ज्यानंतर सोशल मीडियावर भलत्याच चर्चा रंगल्या होत्या. अनेकांनी तर आता दिनेश कार्तिकसोबत जे झाले तेच यजुवेंद्रसोबत होईल, असे अंदाज वर्तवले होते. मात्र, आता नेटकर्‍यांचे भाकीत खरे होते की काय, असा प्रश्‍न पडू लागला आहे.

धनश्रीने लग्‍नानंतर आपल्या इन्स्टाग्राम आयडीमध्ये चहल आडनाव जोडले होते. मात्र, अलीकडेच तिने चहलचे आडनाव काढून आपला इन्स्टाग्राम आयडी केवळ धनश्री वर्मा असा केला आहे. धनश्रीने हँडल नाव बदलल्यावर चहलनेसुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी पोस्ट केली होती. नवीन आयुष्याची सुरुवात, असे लिहिलेली इमेज चहलने काही वेळ ठेवून डिलीट केली. यामुळे आता या दोघांमध्ये काही तरी बिनसले आहे, असे दिसून येत आहे. या दोघांच्याही अकाऊंटवर अजून एकमेकांसोबतचे फोटो आहेत. यजुवेंद्र चहलने याबाबत अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT