Latest

मोतीलाल नगर म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला शासनाची मान्यता!

Arun Patil

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. या पुनर्विकास प्रकल्पातून 33 हजार घरे उपलब्ध होणार असून ती सर्वसामान्यांना मिळणार आहेत.

म्हाडाच्या गोरेगाव (प.) येथील मोतीलाल नगर येथील सुमारे 50 हेक्टर जागेवर गाळ्यांची अंदाजित संख्या 3700 व झोपड्यांची संख्या अंदाजे 1600 अशी एकत्रित 5300 इतकी आहे. पुनर्विकासास मुबलक जागा उपलब्ध आहे. शिवाय, सध्या तेथे अस्तित्वात असलेल्या रहिवाशांना त्यांच्या सध्याच्या घराच्या क्षेत्रफळापेक्षा मुबलक मोकळी जागा वापरण्यास उपलब्ध होणार आहे.

या वसाहतीचे एकूण क्षेत्र सुमारे 50 हेक्टर क्षेत्रफळ आहे. पुनर्विकासासाठी प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावली अनिवासी वापराकरीता अधिकचे बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करावयाचे असल्याने या प्रकल्पास विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. पुनर्वसन हिस्सा वगळून उर्वरित शिल्लक चटई क्षेत्रफळापैकी जास्तीत जास्त हिस्सा म्हाडास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एजन्सीची निविदा अंतिम करण्यात येईल.

निविदा अंतिम करण्यापूर्वी शासनाची पूर्वमान्यता घ्यावी लागेल. या प्रकल्पांतर्गत निवासी वापराकरीता प्रतीगाळा 1600 चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येईल. बांधकाम खर्च या पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या एजन्सीला करावा लागेल.

अनिवासी वापराकरीता प्रतीगाळा 987 चौ.फु. इतके बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येईल . हा प्रकल्प म्हाडा स्वत: पूर्ण करणार आहे. तथापि, म्हाडाला हा प्रकल्प राबविणे सद्यपरिस्थितीत शक्य नसल्याने एजन्सीची नियुक्ती करुन अप्रत्यक्षपणे म्हाडाला प्रकल्प राबवावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT