Latest

मुंगसाच्या केसांपासून बनवले ब्रश, वनविभागाच्या कारवाईमुळे खळबळ

backup backup

कराड; पुढारी वृत्तसेवा : रंग व्यावसायिकांच्या दुकानांवर एकाच वेळी छापा टाकून वनविभागाने मुंगूस या वन्यप्राण्याच्या केसांपासून बनविलेले 1735 ब्रश जप्त केले. कराड व मलकापूर येथे बुधवार दि. 15 रोजी वनविभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्तपणे धडक कारवाईची मोहिम राबविली. यामध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

शिवानी पेंट्सचे राजेंद्र विठ्ठल सुपणेकर (वय 37, रा. मलकापूर, कराड), देवकर पेंट्सचे संदीप किसनराव देवकर (वय 45, रा. शनिवार पेठ, कराड), मलकापूर येथील सनशाईन पेंट्सचे तोहीम नजीर शेख (वय 39, रा. वघेरी), भारत पेंट्स मलकापूर येथील नविद गुल्महुसेन वाईकर (वय 24), सह्याद्री पेंट्स कराड येथील अखतर सिराज वाईकर (वय 51) अशी वनविभागाने कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
यामध्ये शिवानी पेंट्समधून 92 ब्रश, देवकर पेंट्समधून 447 ब्रश, सनशाईन पेंट्समधून 212 ब्रश, भारत पेंट्समधून 163 ब्रश व सह्याद्री पेंट्समधून 821 ब्रश, असे एकूण 1735 मुंगूस या वन्यप्राण्याच्या केसांपासून बनवलेले ब्रश वनविभागाने जप्त केले आहेत.

याबाबत वनविभागाने दिलेले माहिती अशी की, कराडसह मलकापूरमधील अनेक रंगाच्या दुकानांमध्ये मुंगूस या वन्यप्राण्याच्या केसांपासून ब्रस बनविल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार खात्री झाल्यानंतर त्यांनी कारवाईची धडक मोहिम राबविली.

उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो मुबंई येथून आलेले कोन्स्टेबल विजय नांदेश्वर व संदीप येवले तर वनविभाग कराड येथील वनपाल ए.पी.सावखंडे, डी. डी. जाधव, बी. बी. कदम, वनरक्षक रमेश जाधवर, दत्ता जाधव, अरुण सोळंखी, उत्तम पांढरे, अश्विन पाटील, शंकर राठोड, सुभाष गुरव, सविता कुट्टे, दीपाली अवघडे, पूजा परुले, पूजा खंडागळे, शीतल पाटील, संतोष यादव, अरविंद जाधव यांनी ही कारवाई केली.

मुंगूस हा वन्यजीव असून निसर्ग साखळीत हा किडे खाऊन एक महत्वाची भूमिका बाजावत असतो. काही लोक या निरुपद्रवी प्राण्यास मारून त्याच्या कातडी व केसांपासून ब्रश बनवत असतात. सदर ब्रश हे रंगारी, आर्टिस्ट हे वापरतात. तरी सदर ब्रश बाळगणे व त्याची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार मुंगूस प्राणी हा शेड्युल 2 भाग 2 मध्ये येतो.
– महादेव मोहिते,
उपवनसंरक्षक सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT