लंडन ः वृत्तसंस्था ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे गुरुवारी निधन झाले आणि त्या पन्नास कोटी डॉलर एवढी संपत्ती मागे ठेवून गेल्या आहेत. आता ही संपत्ती नवे सम्राट चार्ल्स (तृतीय) यांना वारसा हक्काने मिळणार आहे. ब्रिटनच्या राजघराण्याला करदात्यांकडून मोठी रक्कम प्राप्त होते. त्याला सार्वभौम अनुदान (सॉव्हरिन ग्रँट) म्हणतात. ब्रिटनच्या राजघराण्याला क्राऊन इस्टेटकडून प्रत्येक वर्षी ग्राऊंड इस्टेटच्या नफ्यातील 25 टक्के रक्कम दिली जाते.
याशिवाय अन्य माध्यमांतूनही मोठी मिळकत प्राप्त होते. राजघराण्याच्या उत्पन्नाचा काही भाग डची ऑफ लँकेस्टरमधील गुंतवणुकीमधून येतो. ही गुंतवणूक स्थूलपणे कृषी, व्यावसायिक आणि निवासी अशी विभागलेली आहे. ही मालमत्ता ट्रस्टच्या नावावर आहेे. महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या निव्वळ संपत्तीबाबत वेगवेगळ्या अहवालांमध्ये अनेक दावे करण्यात आले आहेत. 'फॉर्च्युन'च्या मते, राणी एलिझाबेथ यांनी 50 कोटी डॉलर संपत्ती मागे ठेवली आहे.
क्राऊन इस्टेट : 19.5 अब्ज डॉलर्स
बकिंगहॅम पॅलेस : 4.9 अब्ज डॉलर्स
डची ऑफ कॉर्नवॉल : 1.3 अब्ज डॉलर्स
डची ऑफ लँकेस्टर : 748 दशलक्ष डॉलर्स
केन्सिंग्टन पॅलेस : 630 दशलक्ष डॉलर्स
स्कॉटलंडची क्राऊन इस्टेट : 592 दशलक्ष डॉलर्स