Latest

मंत्री चंद्रकांत पाटील नेमके कोणासोबत?

Arun Patil

गडहिंग्लज, प्रवीण आजगेकर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरू झाला आहे. निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांमध्ये लढत होत असली तरी चर्चा सुरू आहे ती भाजपच्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची व फोटोची. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो दोन्ही पॅनेलच्या डिजिटल बोर्डावर झळकत असल्याने आता सभासद व भाजपचे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत.

'गोडसाखर'च्या रणांगणामध्ये आ. हसन मुश्रीफ यांनी डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्याशी युती करत शाहू आघाडीची रचना केली, तर विरोधात आ. राजेश पाटील यांनी अ‍ॅड. शिंदे यांच्यासह नलवडे, खोत यांची बेरीज करत काळभैरव आघाडी केली. या आघाड्या केल्यानंतर डिजिटल बोर्ड केल्यावर मात्र या दोन्ही आघाड्यांच्या बोर्डवर चंद्रकांत पाटील यांचे फोटो झळकले आहेत हे विशेष!

आ. मुश्रीफ यांच्या आघाडीत असलेले प्रकाश चव्हाण हे मागील काही काळापासून भाजपसोबत आहेत. डॉ. शहापूरकर यांनीही विविध निवडण्ाुकांमध्ये भाजपचे नेतृत्व केले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या बॅनरवर ना. चंद्रकांत पाटील यांचा फोटो वापरला. विरोधी पॅनेलच्या बोर्डवर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासह शहराध्यक्ष राजू तारळे, प्रीतम कापसे या दोन्ही अपक्षांचेही फोटो असल्याने त्यांनीही भाजप आपल्या सोबत असल्याचा दावा करत मंत्री पाटील यांचा फोटो वापरला आहे. दरम्यान, भाजपचे कार्यकर्ते तारळे व कापसे या दोघांनीही लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजपचा पाठिंबा कोणाला..?

दोन्ही पॅनेलकडून मंत्री पाटील यांचा फोटो वापरला असला तरी भाजप नेमका कोणासोबत? याची अधिकृत माहिती मात्र दिली जात नाही. यापूर्वी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी अद्याप निर्णय व्हायचा आहे, एवढेच प्रसिद्धीपत्रक काढले होते. त्यामुळे भाजपचा पाठिंबा नेमका कोणाला? याचा अंदाज लावून सभासद वेगवेगळी गणिते मांडत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT