Latest

भ्रष्टाचारी मंत्र्यांमुळे राज्याची प्रतिमा मलीन : आ.पृथ्वीराज चव्हाण

Arun Patil

कराड, पुढारी वृत्तसेवा : शिंदे सरकार मधील एका मागोमाग मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. बिल्डरांच्या हातामध्ये राज्य व्यवस्था गेली आहे. हे पाहता आपल्याला योग्य लोक निवडता आले पाहिजेत, याची जाणीव झाली. राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसविणे कठीण आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

गोळेश्वर (ता. कराड) येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून एक कोटी दोन लाख रुपये व खा. श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून आठ लाख रुपये निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

खा. श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील – उंडाळकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, युवा नेते इंद्रजित चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रमोद चौधरी, कराड तालुका खरेदी – विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, नरेंद्र नांगरे – पाटील, कराड अर्बन बँकेचे संचालक महादेव शिंदे, मलकापूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नितीन थोरात, कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव सुतार, माजी सदस्य नामदेव पाटील, गोकाक पाणीपुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष सावकर जाधव, कार्वेचे माजी सरपंच वैभव थोरात यांची उपस्थिती होती.

आ. चव्हाण म्हणाले, कराड दक्षिण मतदारसंघातील लोकांनी जो विचार जपला आहे. त्या विचारांचे पावित्र्य दूषित होणार नाही, याची काळजी लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. यातून स्फूर्ती घेवून यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील – उंडाळकर यांच्यासह मी व खा. श्रीनिवास पाटील यांनी नेतृत्व करत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची जपणूक केली आहे. या मतदारसंघाचा इतिहास जपूया.खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, एका वाड्यात आम्हा दोघांच्या दोन चौकटी आहेत. मी आणि पृथ्वीराज बाबा हातात हात घालून मतदारसंघ पुढे घेवून जावू. दौलतराव इंगवले, गोकाकचे माजी अध्यक्ष संजय जाधव, माजी सरपंच संतोष जाधव, सचिन पाटील, अनिल जाधव, हणमंतराव जाधव, सहदेव झिमरे, निवास जाधव, श्रीरंग जाधव यांनी स्वागत केले. विकास जाधव यांनी प्रास्ताविक केले. दौलतराव इंगवले यांनी आभार मानले.

प्रकल्प गेल्याने युवकांचे भवितव्य अंधारात

एकेकाळी राज्य प्रशासनाची किर्ती व आदर्श असणार्‍या राज्याची आज दुर्दैवी अवस्था झाली आहे. हिवाळी अधिवेशनात ठोस हाती आले नाही. मंत्र्यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला प्रकल्प पळवत आहेत. त्यांना कोणी विचारत नसल्याने युवकांचे भवितव्य अंधारात आहे, असा आरोप आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT