जळगांव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळात सीबीआय ट्रॅप : भुसावळ येथील रेल्वेचे विभागीय कार्यालयात अर्थात डीआरएम ऑफिसमध्ये सीबीआयच्या पथकाने धाड टाकल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली. यामध्ये दोन अधिकार्यांना अटक करण्यात आली आहे.
भुसावळ डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य,वर्ग-1) एम.एल.गुप्ता व ओ.एस.संजय रडे यांना दोन लाख 40 हजारांची लाच घेताना नागपूर सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
नागपूर सीबीआयच्या 18 जणांच्या पथकाने आज (ता.१६) दुपारी डीआरएम कार्यालयातील अधिकार्यांच्या दालनातच लाच घेताना अधिकार्यांना अटक केल्याने लाचखोरा अधिकार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नागपूर सीबीआयचे उपअधीक्षक एस.आर.चौगुले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकार्यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला. मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी गुप्ता यांनी दोन लाख तर रडे यांनी 40 हजारांची लाच मागितल्याने मलकापूर येथील तक्रारदारो नागपूर सीबीआयडे तक्रार केली होती.
लाचेची पडताळणी केल्यानंतर सोमवारी सापळा यशस्वी करण्या आला. दरम्यान, दोघा अधिकार्यांच्या घराची सीबीआयकडून झडती सुरू असून त्यात काय सापडले याबाबत माहिती कळू शकली नाही.