रोज भिजवलेले थोडे दाणे खाल्ल्यास आरोग्याच्या काही समस्या दूर होऊ शकतील. दाणे भिजवून खाल्ल्याने त्यातील पोषक घटक आणि लोह रक्ताभिसरण योग्य राहण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयविकारासह अनेक आजार बरे होण्यास मदत होते.
* भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास रक्ताभिसरण नियंत्रित करून हृदयाचा झटका येण्यासारख्या समस्यांपासून बचाव होण्यास मदत होते.
* शेंगदाण्यात असलेले कॅल्शिअम, जीवनसत्त्व आणि प्रथिने स्नायूंना आकार देण्यास मदत करतात.
* तंतुमय पदार्थांचे प्रमाण शेंगदाण्यात अधिक असल्याने त्याचे सेवन केल्यास पचनसंस्था योग्य राहते.
* शेगदाण्यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॉपर, कॅल्शिअम, लोह, सेलेनियम हे सर्व घटक असल्याने भिजवलेले शेंगदाणे सकाळी अनशापोटी सेवन केल्यास पोटात वायू होणे तसेच पित्त होणे यासारख्या समस्या दूर होतात.
* लहान मुलांना सकाळी थोडे भिजवलेले दाणे खायला घातल्यास त्यातील जीवनसत्वांमुळे नजर चांगली राहते, तसेच स्मरणशक्तीही वाढते.
* शेंगदाण्यांमुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.
* महिलांनी रोज कमीत कमी अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास दिवसभरासाठी चांगली ऊर्जा मिळते.
* भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन गुळाबरोबर सेवन केल्यास सांधेदुखी आणि कंबरदुखी कमी होऊ शकते.
– डॉ. मनोज कुंभार