लंडन ; वृत्तसंस्था : ब्रिटन मधील लिव्हरपूल शहरात एका महिल रुग्णालयालगत आत्मघातकी बॉम्बस्फोट करण्यात आला. सुदैवाने या स्फोटात केवळ हल्लेखोर दहशतवादीच ठार झाला आहे. रुग्णालयाबाहेरील एका मोटारीत हा स्फोट झाला.
पोलिंसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याची पुष्टी केली आहे. ज्या टॅक्सीत हा स्फोट झाला, त्या टॅक्सीचालकाने स्फोटापूर्वीच चालू टॅक्सीतून बाहेर उडी घेतली. उडी घेण्यापूर्वी त्याने टॅक्सीला बाहेरून लॉक केले होते. यामुळे अनेकांचे प्राण वाचले व केवळ दहशतवादी यमसदनी पोहोचला.
टॅक्सीचालक डेव्हिड पॅरी हा या घटनेने ब्रिटन चा हिरो ठरला आहे. पॅरी जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ब्रिटिश दहशतवाद विरोधी पथकाने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत टॅक्सीतील एक अन्य प्रवासी मरण पावल्याचे सांगण्यात येते. हल्लेखोराने स्वत: हा बॉम्ब तयार केला होता, असेही सांगण्यात आले.पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी टॅक्सीचालक पॅरीचे कौतुक केले आहे.