सलमान  
Latest

बॉक्सर निखतसोबत सलमान खानचा डान्स (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : भाईजान सलमान खानचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये अनेक क लाकार आणि खेळाडू यांचाही समावेश आहे. नुकतीच भारताची प्रसिद्ध महिला बॉक्सर निखत झरीन आणि सलमान खान यांची भेट झाली. निखत झरीनहिचे बॉक्सिंगसह सलमानवरही प्रेम आहे.

निखत झरीनची गेली अनेक वर्षे सलमानला भेटण्याची इच्छा होती. तिने यापूर्वी अनेक मुलाखतींमध्येती इच्छा बोलूनही दाखवली आहे. आता अखेर निखतचे सलमानला भेटण्याचे स्वप्नपूर्ण झाले आहे. नुकतीच तिने सलमान खानची भेट घेतली आहे. भेटल्यावर केवळ गप्पाच नाही, तर तिने त्याच्यासोबत एका चित्रपटातील गाण्यावर डान्सही केला आहे. निखतने सोशल मीडिया अकाऊंटवर सलमानच्या भेटीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओतनिखत सलमानसोबत 'साथिया तुने क्या कि या' गाण्यावरडान्स करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना निखत झरीनने एक खास कॅप्शनही लिहिले आहे. तिने लिहिले आहे की, 'अखेरप्रतीक्षा संपली आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT