Latest

बेळगाव : प्रशासनाचा स्वागत फलक मराठीत हवा

अमृता चौगुले

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठकीत घेण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्षपदी रमांकात कोंडुसकर यांची एकमताने निवड करण्यात आली. त्याचबरोबर गणेशोत्सवात प्रशासनाकडून उभारण्यात येणार्‍या स्वागत मंचावरील फलक मराठीत लावण्याची मागणी करण्यात आली.

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक रविवारी सायंकाळी येथील सिद्धनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सरचिटणीस शिवराज पाटील यांच्यासह शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. रमांकात कोंडुसकर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कोंडुसकर म्हणाले, आपला विश्‍वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बेळगावच्या गणेशोत्सावाल 120 वर्षांची परंपरा आहे. हा सण शांततेत, संयमाने आणि उत्साहात साजरा करायचा आहे. गणेशोत्सवामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात यावेत. वाजंत्री, मूर्तिकार, डेकोरेटर्स आदींना याद्वारे रोजगार मिळाला पाहिजे. आपल्या ज्या काही समस्या असतील त्या प्रशासनाबरोबर चर्चा करून सोडवण्यात येतील.

गतषर्वी महापालिकेने स्वागत मंचावरील फलक कानडीत लावला होता. मराठीत लावतो, असे सांगून तो ऐनवेळी लावला नाही. यावर्षी हा स्वागत फलक मराठीत लावण्यात यावा किंवा दोन्ही भाषेत लावण्यात यावा अन्यथा कोणताही फलक लावूच नये, असा निर्णय घेण्यात आला.

शिवराज पाटील यांनी स्वागत केले. रणजित चव्हाण पाटील, मदन बामणे, विकास कलघटगी, बाबुलाल पुरोहित, महादेव पाटील आदींनी मनोगत व्यक्‍त केले. मदन बामणे यांन आभार मानले.

गणेशोत्सव महामंडळाची नूतन कार्यकारणी- अध्यक्ष : रमाकात कोंडुसकर, कार्याध्यक्ष : रणजित चव्हाण-पाटील, सरचिटणीस : महादेव पाटील, स्वागताध्यक्ष : मदन बामणे.

बैठकीतील निर्णय

  • पीओपीला परवानगी देण्यात यावी
  • हेस्कॉमकडून अनमान रक्‍कम नको
  • डॉल्बीचा आवाज नियंत्रणात ठेवण्यात यावा
  • मिरवणूक प्रशासनाने घालून दिलेल्या वेळेत सुरू करून वेळेत संपवण्यात यावी
  • मिरवणूक एकाच ठिकणी अधिक वेळ थांबवण्यात येऊ नये
  • सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना महामंडाळात सामावून घ्यावे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT