Latest

बिल गेट्स यांच्या मुलीचा व्यावसायिक घोडेस्वाराशी विवाह

Arun Patil

न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक व अब्जाधीश उद्योगपती बिल गेट्स आणि त्यांची माजी पत्नी मेलिंडा गेट्स यांची मोठी मुलगी जेनिफर कॅथरिन ही व्यावसायिक घोडेस्वार असलेला बॉयफ्रेंड नायल नासरसोबत नुकतीच विवाहबंधनात अडकली. या दोघांचे जानेवारी 2020 मध्ये एगेंजमेंट झाले होते.

जेनिफर व नासर यांच्या विवाहाप्रित्यर्थ शनिवारी दुपारी न्यूयॉर्कमध्ये आयोजित स्वागत समारंभास सुमारे 300 पाहुणे उपस्थित होते. हा समारंभ न्यूयॉर्कच्या नॉर्थ सेलममधील 142 एकरांत पसरलेल्या हॉर्स फार्ममध्ये पार पडला. विवाह समारंभास मेलिंडा गेट्सही उपस्थित होत्या. मेलिंडा यांनी ऑगस्ट 2021 मध्ये बिल यांच्याशी घटस्फोट घेतला होता.

दरम्यान, स्वागत समारंभानंतर बिल गेट्स यांनी जेनिफरसोबत एल्टन जॉन यांच्या 'कॅन यू फिल द लव्ह टूनाईट' या गाण्यावर नृत्यही केले. विवाहानंतर जेनिफरकडे किती संपत्ती आणि नासरकडे नेमके काय काय आहे? हे जाणून घेण्याचा उपस्थितांनी प्रयत्न केला. जेनिफरजवळ 150 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

नायल नासरचे माता-पिता आर्किटेक्चर व डिझाईन फर्मचे मालक आहेत. नासर कॅलिफोर्नियात राहतो व तो व्यावसायिक घोडेस्वार असून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. घोडेस्वारीदरम्यानच नायल आणि जेनिफर यांची ओळख झाली आणि त्याचे प्रेमात रूपांतर झाले.

शाही विवाहावर 15 कोटी खर्च

या विवाहासाठी सुमारे 20 लाख डॉलर्स (15 कोटी रुपयांहून अधिक) खर्च करण्यात आले. जेनिफरने विवाहावेळी कस्टम वेरा गाऊन परिधान केला होता. तर 9 ब्राईडमेडस्ने जेनिफरला विवाहासाठी सजवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT