Latest

कोल्हापूर : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर निवड, मार्गदर्शन

मोहन कारंडे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' आयोजित पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी- चिंचवड युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार होणार आहे. शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे शुक्रवारी (9 जून) सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी खास आयोजित करण्यात आला आहे.

सेमिनारमध्ये विजय नवले, प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक व समुपदेशक हे '10 वी, 12 वी नंतरच्या करिअर संधी' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. केतन देसले, डिजिटल मार्केटिंग हेड 'पीसीईटी' हे '12 वीनंतर इंजिनिअरिंग, एमबीए प्रवेश प्रक्रिया' याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी कोणती शाखा निवड करावी, कोणकोणते कॉलेज आहेत, प्रवेश प्रक्रिया, अर्ज कसा करावा, कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, मार्केटमधील ट्रेंड याबाबत माहिती देत अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात येणार आहे.

बारावी बोर्डाच्या परीक्षेनंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात करिअरचे टेन्शन असते. एक काळ असा होता की दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांसमोर फारसे पर्याय उपलब्ध नसायचे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडणे सर्वात कठीण होते. आपण कोणता विषय किंवा अभ्यासक्रम निवडावा जो आपले भविष्य घडवण्यास मदत करेल या विचाराने विद्यार्थी तणावात असायचे. पण, आज करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडू शकतात. यासह अन्य क्षेत्रांतील करिअरच्या संधीबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तंत्रशुद्ध विनामूल्य मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे.

बारावीनंतरच्या करिअर निवडीसाठी आठवी, नववी, दहावी, अकरावीपासूनच अभ्यासाची दिशा ठरवावी लागते. त्यामुळे या व्याख्यानास बारावीच्या विद्यार्थ्यांसोबतच आठवी, नववी, दहावी, अकरावीचे विद्यार्थी आणि पालक यांनाही याचा विनामूल्य लाभ घेता येणार आहे. या व्याख्यानात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी गरजेची आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी पूर्वनोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9834433274, 9404077990 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

विषय : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन
तारीख : शुक्रवार, 9 जून 2023
वेळ : सकाळी 10.30 वाजता
स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर
प्रवेश : विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रवेश विनामूल्य


वरील दिलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून किंवा दिलेल्या लिंक वर जाऊन नाव नोंदणी करा.
https://t.ly/ZDfm

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT