लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निवासस्थान असलेला बकिंघम पॅलेस जगभरातील पर्यटकांचे एक आकर्षण असतो. या आलिशान पॅलेसची किंमत अधिक आहेच, शिवाय जर हा पॅलेस भाड्याने दिला तर त्याचे भाडेही अव्वाच्या सव्वा असेल. अर्थातच हा पॅलेस विक्रीसाठी किंवा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध नाही. या महालामध्ये 775 खोल्या असून तो त्याची जर विक्री करायची ठरवलीच तर ती 1.3 अब्ज पौंडमध्ये (1,27,20,63,78,000 रुपये) होईल, असे मॅक्कार्थी स्टोन यांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
या मालमत्तेच्या किमतीत कोरोनानंतर 10 कोटी पौंडांची वाढ झाली आहे. रिटायर्मेंट प्रॉपर्टी डेव्हलेपरच्या मते, 2022 मध्ये ब्रिटिश शाही संपत्तीची किंमत 3.7 अब्ज पौंड आहे. 2019 पासून 46 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ब्रिटनची शाही संपत्ती आणि महाल देशभरात आहेत. एका अहवालानुसार जर राजघराण्याने बकिंघम पॅलेस भाड्याने देण्याचे ठरवले तर त्याचे एक महिन्याचे भाडे 26 लाख पौंड म्हणजेच 25 कोटी 43 लाख, 29 हजार 114 रुपये इतके असेल! अर्थात अशा मालमत्ता विक्रीसाठी किंवा भाड्यासाठी देता येत नाहीत. शाही घराण्याची मालमत्ता ही हाऊस ऑफ विंडसरची वैयक्तिक मालमत्ता नाही. ही इंग्लंडची मालमत्ता आहे, जी ट्रस्टकडून चालवली जाते. सध्या ब्रिटनमध्ये महाराणीची प्लॅटिनम ज्युबिली साजरी करण्याची तयारी सुरू असताना हे सत्य समोर आले आहे.