कोरोनाच्या जागतिक संकटामुळे इतर सर्वच क्षेत्रांप्रमाणे शैक्षणिक क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत आपल्या शैक्षणिक आकांक्षांना दिशा देण्यासाठी 'पुढारी' एज्युदिशा ऑनलाईन 2021 या शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. 7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे. यासाठी www.pudhariexpo.com यावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या युगात अत्यावश्यक असणार्या शिक्षण आणि करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी दै. 'पुढारी'च्या वतीने 2009 पासून 'पुढारी' एज्युदिशा या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. गतवर्षीपासून सुरू असणार्या कोरोनावर उपाययोजनेसाठी लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांकरिता यंदा प्रथमच 'पुढारी' एज्युदिशा ऑनलाईन 2021 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का? कॉलेज कधी सुरू होणार? ऑनलाईन का ऑफलाईन? माझे वर्ष वाया तर जाणार नाही ना? लॉकडाऊनमध्ये एंट्रन्स एक्झाम कशी होणार? मेडिकल, इंजिनिअरिंग की मॅनेजमेंट? डिप्लोमा की डिग्री? असे अनेक प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांना भेडसावत आहेत. यामुळे करिअरचे काय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नामांकित शिक्षण संस्था व तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनात नामांकित, मान्यताप्राप्त विद्यापीठे, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस स्टॉल्स यांचा समावेश असणार आहे.
यामुळे विद्यार्थी व पालकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नामांकित संस्थांचे कौन्सिलर व तज्ज्ञांकडून घरबसल्या कॉल, चॅट व व्हिडीओ कॉलद्वारे मिळणार आहेत.
याशिवाय अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ, मोटिव्हेशनल स्पीकर यांचे लाईव्ह वेबिनार यांच्या माध्यमातून शिक्षणामधील न्यू रिअॅलिटी समजून घेता येणार आहे.
दैनिक 'पुढारी' एज्युदिशा ऑनलाईन शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मालिकेचा लाभ विद्यार्थी व पालकांना घरबसल्या सहकुटुंब घेता येणार आहे.
यासाठी www.pudhariexpo.com यावर नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्याबरोबरच प्रदर्शनासाठी तयार करण्यात आलेला 'क्यूआर कोड' स्कॅन करून विनामूल्य नोंदणी करता येणार आहे.
मोबाईल, पी.सी., लॅपटॉपच्या माध्यमातून प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
याशिवाय आपल्याकडे स्मार्ट टीव्ही असेल, तर त्या माध्यमातून आपल्याला एकत्रित घरबसल्या हे प्रदर्शन आणि यातील तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन याचा लाभ सहकुटुंब घेता येणार आहे.