नैरोबी : जगाच्या पाठीवर काही माणसं अशी आहेत ज्यांना अनेक बायका व अनेक मुलं आहेत. त्यामध्येच डेव्हिड साकायो कालुहाना नावाच्या आफ्रिकन माणसाचा समावेश होतो. या माणसाला 15 बायका असून 107 मुलं आहेत. 61 वर्षांचे डेव्हिड पश्चिम केनियामधील आपल्या गावात या मोठ्या कुटुंबासह आनंदात राहतात!
डेव्हिड यांच्यावर आता एक लघुपट बनवण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले की माझा बुद्ध्यांक म्हणजेच आयक्यू अतिशय चांगला आहे. त्यामुळे मला सांभाळणे ही एकाच पत्नीच्या आवाक्यातील बाब नाही. डेव्हिड हे एक इतिहासकार आहेत व आपण चार हजारांहून अधिक पुस्तकं वाचल्याचा त्यांनी दावा केला आहे.
त्यांच्या सर्व बायका आपापली कामे वाटून घेतात आणि एकमेकींसमवेत आनंदाने राहतात असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव जेसिका कालुहाना असे आहे. तिला तेरा मुलं आहेत. नवर्याने नवी बायको घरी आणल्याबद्दल मला कधीही इर्ष्या वाटली नाही, असे ती सांगते. डेव्हिडची सातवी बायको रोझ हिनेही संपूर्ण कुटुंब आनंदाने एकत्र राहत असल्याचे सांगितले.