पाटणा; वृत्तसंस्था : नितीश कुमार हे सात जन्मात पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आणि संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी केली. सिंह हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वतः सिंह यांनीच ही माहिती दिली.
ते म्हणाले, नितीशकुमार खोटे बोलत आहेत. नितीशकुमार यांच्या सहमतीनेच मी मंत्री बनलो होतो. मंत्रीपदाबाबत पूर्ण माहिती त्यांना होती. संजदचे सध्याचे अध्यक्ष ललन सिंह यांनाही ही माहिती होती. दरम्यान, सिंह हेच संजद-भाजप युती तुटण्याचे कारण मानले जात आहेत. ही युती तुटण्याआधी पक्षाने आरसीपी सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.