न्यूयॉर्क ः विज्ञानयुगात आपण कितीही प्रगती केली. अगदी आपण चंद्र, मंगळ आणि अंतराळातील विविध ग्रहांवर जरी जाऊन आलो तरी, या जीवसृष्टीत अथवा त्याबाहेर एलियन्स आहेत किंवा नाहीत याचे गूढ आजही कायम आहे. एका आता एका शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, होय, खरोखरच एलियन्स अस्तित्वात असून ते अनेकदा पृथ्वीवर येतात. मात्र, कायमस्वरूपी त्यांचे वास्तव्य असते ते सागराच्या तळाशी. अमेरिकेतील 'द डेली स्टार'ने याविषयी खास वृत्त प्रकाशित केले आहे.
त्यानुसार एलियन्स नेहमी समुद्रात राहतात. पृथ्वीची मदत करण्यासाठी ते बाहेर येतात. शार्ली राईट हे एक प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे सहकारी राहिले आहेत. त्यांनी 1947 मध्ये एलियन्सची मुलाखत घेतल्याचा दावा केला होता. शर्ली राईट यांचा दावा होता की, मुलाखतीदरम्यान विविध प्रश्नांची उत्तरे देण्यात आली होती. त्यांनी ही घटना एका डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून सादर केली आहे. खरे सांगायचे तर एलियन्सच्या कथा नेहमीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. जगभरातील अनेक ठिकाणी एलियन्स असल्याच्या बातम्या येतात. अनेक ठिकाणी तर एलियन्सचे फुटेजही उपलब्ध असल्याचा दावा केला जातो.