मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे तत्कालीन नगरविकास मंत्री यांना पहिल्यांदा 361 कोटी, दुसर्या टप्प्यात 2645 कोटी असे मिळून गेल्या अडीच वर्षांत 12 हजार कोटी रुपये विकासनिधी दिला असल्याची माहिती माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत दिली. शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांना कमी विकासनिधी मिळाला, हा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप पवार यांनी आकडेवारी सादर करत खोडून काढला.
अर्थमंत्री म्हणून काम करत असताना आपण कधीच भेदभाव केला नाही. आमदारांचा निधी 1 कोटीवरून 5 कोटीवर केला. डोंगरी विकासाचा निधी वाढवला. मी भेदभाव करणारा माणूस नाही. सर्व खात्याला निधी दिला. देवेंद्रजी आपणही मुख्यमंत्री होतात. फायनल हात मुख्यमंत्री फिरवतात याची आठवणही करून देताना राष्ट्रवादीने कधी अन्याय केला नाही, असे ठासून सांगितले.लोकप्रतिनिधींच्या शिफारशीने 401 शिवभोजन थाळी केंद्र शिवसेनेला दिली. हे काम केले तर मी उपकार केले नाहीत. पण अन्याय केला असा आरोप करत राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा झालेला प्रयत्न योग्य नाही.
रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांना विकासनिधीपोटी 167 कोटी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत 221, कृषिमंत्री दादा भुसे 306, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील 309, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई 294, राज्यमंत्री अब्दुल्ल सत्तार यांना 206 कोटी रुपये विकासनिधी दिला.
आमदार अनिल बाबर यांना 186 कोटी, महेश शिंदे 170, शहाजी पाटील 151, महेंद्र थोरवे 154, भरतशेठ गोगावले 173, महेंद्र दळवी 137, प्रकाश आबिटकर 175, बालाजी किणीकर 60, ज्ञानराज चौगुले 162, तानाजी सावंत 141, प्रकाश सुर्वे 23, बालाजी कल्याणकर 171, संजय शिरसाट 114, प्रदीप जयस्वाल 54, संजय रायमूलकर 147, संजय गायकवाड 156, विश्वनाथ भोईर 80, शांताराम मोरे 198, श्रीनिवास वनगा 169, किशोरअप्पा पाटील 170, सुहास कांदे 127, चिमण पाटील 176, लता सोनवणे 188, प्रताप सरनाईक 47, यामिनी जाधव 22, योगेश कदम 167, मंगेश कुडाळकर 24, दीपक केसरकर 170, संजय राठोड 189, सदा सरवणकर 23, रमेश बोरनारे 139, तर दिलीप लांडे यांना 23 कोटी रुपये दिल्याचे पवार यांनी
सांगितले.